Farmer Protest: यावर्षीच्या (२०२६-२७) गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ४२५० रुपये तर अंतिम दर प्रतिटन ५ हजार रुपये द्यावा. शेतकऱ्यांची सातत्याने फसवणूक करणाऱ्या कारखान्यांना ऊस न देण्याच्या निर्धारासह अनेक ठराव शनिवारी (ता.१७) ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व युवा शेतकरी संघर्ष समिती यांच्यातर्फे पोखर्णी नृसिंह (ता.परभणी) येथे ऊस परिषदेत मंजूर करण्यात आले..अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर, किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड अजय बुरांडे,ओंकार पवार, नारायण गोलेपाटील, अजयसिंह राऊत, तुकाराम नावलकर, सुरेश इखे, तुकाराम वाघ, कॉ.प्रसाद गोरे, श्रीराम बडे, कॉ.दिपक लिपने, शिवाजी कदम, ॠषीकेश जोगदंड आदि उपस्थित होते..Sugarcane Rate : हुतात्मा कारखान्याने ३८५० रुपये दर देण्याची शेतकरी संघटनेची मागणी.कॉम्रेड बुरांडे म्हणाले की, दुष्काळामुळे आर्थिक संकटातील शेतकऱ्यांच्या उसाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला पाहिजे. शास्त्रीय पद्धतीने दर वाढीची मागणी करत आहोत. शेतकऱ्यांच्या एकजुटीने गतवर्षी उसाला वाढीव दर मिळाला. दुष्काळाचे भांडवल करून कारखानदारांनी शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करू नये..Farmers Demand: उसाला ६५०० रुपये दर जाहीर करा.कॉम्रेड क्षीरसागर म्हणाले की, कृषी मूल्य आयोगाने महागाई निर्देशांकानुसार दर काढलेला नाही, तर उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा या सूत्रानुसार भाव द्यावा. पहिली उचल ४२५० रुपये मिळत नाही तोपर्यंत उसाला कोयता लावायचा नाही. एकजूटीन लढा चालवायचा आहे. ऊस परिषदेत परभणी आणि बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..ऊस परिषदेत मंजूर ठराव...उसाला पहिली उचल प्रतिटन ४२५०, अंतिम दर ५ हजार रुपये मिळण्यासाठी संघर्षचालू हंगामात समाधानकारक ऊस दर निश्चित न करणाऱ्या कारखान्याचे गाळप बंद करत कोयता बंद,वाहतूक बंद आणि कारखाना बंदचा इशाराशेतकऱ्यांची वारंवार फसवणूक करणारा जी सेव्हन शुगर्स गंगाखेड,श्रीलक्ष्मी नृसिंह अमडापूर या कारखान्याला ऊस न देण्याचा ठराव.ऊस तोडीनंतर विनाविलंब देयक अदा करावे.वाहतूक ठेकेदारांचे मागील थकीत बाकी तात्काळ द्यावे.जायकवाडी कालव्यातून ऊस तसेच रब्बी पेरणीसाठी चार पाणी आवर्तने द्यावीत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.