Sugarcane Farming : शेतकऱ्यांचा उसाच्या पिकाकडे वाढतोय कल

Sugarcane Cultivation : गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाला, परिणामी जलस्रोतांच्या साठ्यात मोठी भर पडली. यंदा पाणी उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचा उसाच्या लागवडीकडे कल वाढला आहे.
Sugarcane
Sugarcane FodderAgrowon
Published on
Updated on

Latur News : गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाला, परिणामी जलस्रोतांच्या साठ्यात मोठी भर पडली. यंदा पाणी उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचा उसाच्या लागवडीकडे कल वाढला आहे. तालुक्यात १ हजार २८० हेक्टरवर उसाची लागवड झालेली आहे. शिवाय अनेक शेतशिवारात सध्या ऊस लागवडीची लगबग दिसून येत आहे.

पावसाचा सतत लहरीपणा, यातुन निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, पावसाचा प्रदीर्घ खंड,तर कधी गारपीट अशा संकटाच्या मालिकेला शेतकरी गेल्या काही वर्षांपासून तोड देत आहे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांनी हंगामी पिकाकडे पाठ फिरवत बारामाही पिकाला प्राधान्य देण्यास सुरवात केली आहे.

Sugarcane
Sugarcane Loan Rates : पुढील हंगामात ऊसपीक कर्जदरात होणार वाढ; हेक्टरी ८ हजार ५०० रूपयांची वाढ होणार

त्यातही उसाकडे कल वाढला आहे. यंदा पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात भरसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांची लगबग सुरू असल्याचे तालुक्यात दिसून येत आहे. तालुक्यात तिरु नदीवरील बंधाऱ्यांमुळे सिंचनाची मोठी सोय झाली आहे.

Sugarcane
AI Technology in Sugarcane : ‘एआय’आधारित ऊस शेती पाहण्याची संधी

परिणामी बेळसांगवी, सोनवळा, लाळी बुद्रूक, बोरगाव, तिरुका, गव्हाण, अतनूर, रावणकोळा, हाळदवाढवणा या गावात नगदी पिक म्हणून ऊसाची लागवड केली जाते. गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्यामुळे कूपनलिका व विहिरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीस त्यामुळे अनेक शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत.

शेतकऱ्यांकडून सध्या नवनवीन वाणाच्या ऊसाची लागवड केली जात आहे. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबकचा वापर केला जात आहे. एक डोळा पद्धत, टोकन पद्धतीने लागवड केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com