Sugarcane Crushing : ऊस गाळपास कासवगती

Sugarcane Season : यंदाचा हंगाम आता उत्तरार्धात येत असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत कारखान्यांचा गळीत हंगाम संपण्याची गती यंदा कमीच आहे.
Sugarcane Crushing
Sugarcane Crushing Agrowon

Kolhapur News : यंदाचा हंगाम आता उत्तरार्धात येत असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत कारखान्यांचा गळीत हंगाम संपण्याची गती यंदा कमीच आहे. सोमवार (ता. १२) अखेर केवळ ४ साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत १३ कारखाने बंद झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन ७ लाख टनांनी कमी असले तरी मजूर टंचाईमुळे यंदा कारखाने धीम्या गतीने सुरू असून पश्चिम महाराष्ट्रात तर परिस्‍थिती विदारक बनत असल्याचे चित्र आहे.

कारखान्‍यांकडून क्रम पातळीत हस्तक्षेप करण्यात येत असल्‍याने लागणीक्रमानुसार ऊस कारखान्याला जाणे दुरापास्त बनले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील २, सोलापूर व नांदेडमधील प्रत्येकी एक कारखाना बंद झाला आहे.

पूर्वनियोजित अंदाजानुसार फेब्रुवारी अखेरीस हंगाम संपेल अशी शक्यता होती. पण या कालावधीत केवळ ४ कारखाने बंद झाल्याने आणखी एक महिना तरी हंगाम चालेल अशी शक्यता आहे.

Sugarcane Crushing
Sugarcane FRP : सोलापूर विभागात अद्यापही ४४० कोटींची ‘एफआरपी’ थकली

अंतिम टप्प्यात ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः कारखाना व्यवस्‍थापनाची मनधरणी करावी लागत आहे. त्यामुळे ऊस पट्ट्यात अस्वस्थता पसरली आहे. विशेष म्हणजे अवर्षणामुळे यंदा उत्पादन घटल्याने गळीत हंगाम लवकर आटपेल असा अंदाज होता.

मात्र सध्या नेमकी उलटी परिस्थिती आहे. मजूर मिळत नसल्‍याने अनेक गावामध्ये स्थानिक मजुरांकडून (खुदतोड) तोडणी सुरू आहे. कमी क्षेत्रावर ऊस असणाऱ्या उत्पादकांच्या शेतात ऊसतोडणी यंत्र चालत नसल्याने अशा शेतकऱ्यांना मजूरांशिवाय पर्याय नसल्याची स्थिती आहे.

Sugarcane Crushing
Sugarcane Season : साखर कारखान्यांचा मनमानी कारभार अन् वशिलेबाजीला वैतागलेला शेतकरी तोडणीसाठी लावतोय उभ्या उसाला काडी

सोमवारअखेर (ता. १२) ७७५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. ९.७९ साखर उताऱ्याने ७६ लाख टन साखर तयार झाली आहे. २०७ साखर कारखाने सध्या गाळप करत आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत २१० कारखाने सुरू होते. गेल्या वर्षी याच कालावधीत ८५० लाख टन उसाचे गाळप झाले होते.

९.८१ साखर उताऱ्याने ८३ लाख टन साखर निर्मिती झाली होती. राज्‍यात १९ लाख टन साखर तयार करत कोल्हापूर विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. या खालोखाल पुणे व सोलापूर विभाग १६ लाख टन साखर तयार करत संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नगर विभागात ९ लाख टन साखर तयार झाली आहे.

क्रम चुकवून ऊसतोडणी

लावण, खोडवे, निडवे असा क्रम कारखान्यांचा ऊस तोडीसाठी असतो. पण कारखान्यांचे स्‍थानिक कर्मचारी हा क्रम चुकवून उसाची तोडणी देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांत मोठी अस्वस्थता आहे. अनेक उत्पादकांनी उसाची तोड केव्हाही येईल म्हणून उसाला पाणी दिलेले नाही. उन्‍हाची तीव्रता वाढत असल्याने तोडणीसाठी तयार उसाचे नुकसान होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com