Sugarcane
SugarcaneAgrowon

Sugarcane Loss : वारूळवाडीत ऊस जळून खाक

Sugarcane Crop Damage : वीजवाहक तारांमध्ये झालेल्या घर्षणातून ठिणग्या पडल्याने काढणीस आलेल्या अडीच एकर उसाला आग लागून उसासह ठिबक सिंचनचे साहित्य, फळझाडे जळून खाक झाली.
Published on

Narayangaon News : वीजवाहक तारांमध्ये झालेल्या घर्षणातून ठिणग्या पडल्याने काढणीस आलेल्या अडीच एकर उसाला आग लागून उसासह ठिबक सिंचनचे साहित्य, फळझाडे जळून खाक झाल्याची घटना वारूळवाडी येथील शेतकरी दत्तात्रय बनकर यांच्या शेतात मंगळवारी (ता. १७) घडली. यामध्ये सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

महावितरण कंपनीचे शाखा अभियंता बी. एस. बिराजदार, अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद खांडगे, सह्याद्री शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी बुधवारी (ता. १८) घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

Sugarcane
Sugarcane Crop : नदीकाठच्या उसावर तांबेरा, महापुरामुळे ऊस पिकावर गंभीर परिणाम

शेतकरी दत्तात्रय बनकर यांनी अडीच एकर क्षेत्रात उसाची लागवड केली होती. उसाचे पीक तेरा महिन्यांचे झाले होते. या हंगामात ऊस तोडणीस जाणार होता. त्यांच्या उसाच्या शेतात रोहित्र असून या रोहित्राला जोडलेल्या वीज वाहक तारा शेतात लोंबकळलेल्या आहेत. मंगळवारी दुपारी वीजवाहक तारांमधील शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या उसाच्या शेतात पडल्याने उसाचे उभे पीक जळाले. त्याबरोबरच शेतातील ठिबक सिंचनच्या नळ्या, पाइप, बांधावरील आंब्याची झाडे जळून सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले.

Sugarcane
Sugarcane Pest : शिरोळ तालुक्यात उसावर लोकरी माव्यामुळे चिंता

याबाबत शेतकरी सुधीर बनकर म्हणाले, की शेतातील रोहित्र व लोंबकळलेल्या वीज वाहक तारा धोकादायक आहेत. या ठिकाणी वारंवार स्पार्किंग होत असते. यापूर्वीही तीन वेळा शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत उसाचे उभे पीक जळून नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीकडून कोणतीही नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. वारंवार मागणी करूनही धोकादायक रोहित्र बदलले जात नाही. आमच्या नुकसानीला संपूर्णपणे महावितरण कंपनी जबाबदार आहे.

येथील रोहित्रावरून सावरगाव फीडरला वीजपुरवठा केला जातो. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार येथील रोहित्र हलवण्याबाबत अहवाल करण्यात आला असून, वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे. महावितरण कंपनीकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी सहकार्य केले जाईल.
बी. एस. बिराजदार, शाखा अभियंता महावितरण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com