Sugarcane Pest : शिरोळ तालुक्यात उसावर लोकरी माव्यामुळे चिंता

Sugarcane Season : शिरोळ तालुक्यात उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
Sugarcane Pest
Sugarcane PestAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : शिरोळ तालुक्यात उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव जाणवू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. ऊस तोडीच्या हंगामाला अद्याप दोन महिन्यांचा कालावधी आहे.

अशातच आठ ते दहा फुटांपर्यंत उसाची वाढ झाल्याने फवारणी करणे कठीण बनले आहे. अनेक ठिकाणी लोकरी माव्याचा प्रादुर्भाव असलेल्या ऊस पडल्यानेदेखील उपाययोजना करणे कठीण बनले आहेत.

Sugarcane Pest
Sugarcane Season 2024 : ऊस हंगामाचे पडघम वाजू लागले

ज्या शेतात अद्याप लोकरी मेव्याचा प्रादुर्भाव कमी आहे अशा ठिकाणी ऊस काढून नष्ट केला जात आहे. यावर्षी उन्हाळ्यात ऊस पिकाला पाण्याची मोठी टंचाई जाणवली. पाण्याची टंचाई भासत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातील हिरवा ऊस चाऱ्यासाठी विक्री केला. शिरोळ तालुक्यातील ऊस चाऱ्यासाठी जत, विटा, आटपाडी या भागात मोठ्या प्रमाणावर नेण्यात आला.

पावसाळ्यात शिरोळ तालुक्यातील नदी काठच्या शेतकऱ्यांनी महापुराच्या धास्तीने ऊस रोपवाटिका आणि चाऱ्यासाठी विक्री केला होता. ज्या शेतकऱ्यांनी ऊस तसाच ठेवला त्या शेतकऱ्यांच्या उसाचे महापुरात बुडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शासनाकडे मदतीसाठीचा अहवाल पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.

Sugarcane Pest
Sugarcane FRP : ‘मांजरा’चा अंतिम दर २ हजार ७०५ रुपये

पावसाळ्यात कमी दिवसांत जादा पाऊस पडला. परिणामी पाणी साचून राहिलेल्या जमिनीतील उसाला याचा फटका बसला. तीन-तीन आठवडे पाणी शेतात साचून राहिल्याने पांढऱ्या मुळांची वाढ झाली नाही. परिणामी उसाला अन्नघटक पुरवठा करणाऱ्या यंत्रणेच्या अभावामुळे उसाची वाढ खुंटली आहे.

साखर कारखान्याचा हंगाम सुरू होण्यास अद्याप जवळपास दोन महिन्यांचा अवधी बाकी असताना शिरोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये उसावर पांढऱ्या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. उसाची उंची वाढल्याने फवारणी करणेदेखील कठीण बनले आहे. अशा स्थितीत लोकरी माव्यावर नियंत्रण ठेवणे हे एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे उरला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com