Sugarcane Bills : सोलापुर जिल्ह्यात साडेचारशे कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Sugarcane Update : सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून गाळप झालेल्या उसाची बिले दिलेली नाहीत.
Sugarcane
SugarcaneAgrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून गाळप झालेल्या उसाची बिले दिलेली नाहीत. अद्यापही जिल्ह्यातील २३ कारखान्यांकडे ३१ मार्चअखेर ४५१.६९ कोटी रुपये एफआरपी थकली आहे. दरम्यान, ऐन मार्चअखेरच्या धांदलीत कारखान्यांकडून ऊसबिले न आल्याने ऊस उत्पादकांची चांगलीच आर्थिक दमछाक झाली आहे.

Sugarcane
Sugarcane Bill Farmers : शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत अन्यथा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार, राजू शेट्टींचा इशारा

जिल्ह्यातील ३५ पैकी ३१ कारखान्यांचा या वेळचा गळीत हंगाम संपलेला आहे. तथापि, बहुसंख्य कारखान्यांनी अजूनही ऊसबिले थकवली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी उसाचे पैसे हातात येणार या गृहीताने वर्षभर केलेला खर्च, बँकांची कर्जे, उसनवारी याची परतफेड करण्याचे नियोजन केलेले असते.

मात्र ऊसबिलेच न मिळाल्याने या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. फेब्रुवारी, मार्चमध्ये गाळप झालेल्या उसाची बिले अनेक कारखान्यांनी दिली नाहीत. काही कारखान्यांकडे जानेवारीतील बिले थकली आहेत.

Sugarcane
Sugarcane Bill : शिंदे कारखान्याकडून २७५० रुपयांप्रमाणे ऊसबिल

मार्चअखेरच्या धामधुमीत या शेतकऱ्यांच्या मागे वसुलीचा चांगलाच ससेमिरा सुरू होता. बँकांच्या कर्जाचे हप्ते, परतफेड, पाणीपट्टीचा खर्च, खतांसाठी, मशागतीसाठी केलेल्या उधार खर्चाची वसुली यासाठी तगादा सुरू झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

कारखानानिहाय ३१ मार्चअखेर थकित ऊसबिले

कारखाना थकित एफआरपी (कोटींत) दिलेली एफआरपी (टक्के)

पांडुरंग - १००

सिद्धेश्‍वर ३१.३३ ७८.४४

संत दामाजी १०.६८ ८८.०९

सहकार महर्षी - १००

विठ्ठलराव शिंदे, पिंपळनेर - १००

संत कूर्मदास ६.१६ ८६.०७

सासवड माळी १९.३५ ८२.११

लोकमंगल, बिबीदारफळ २१०२४९ १८९२००

सहकार शिरोमणी २३७०५१ २०४०००

विठ्ठलराव शिंदे, पिंपळनेर १८३४०८२ १८४९१००

संत कूर्मदास १८५७०० १३५२००

लोकनेते ६१५२४० ६१७८००

सासवड माळी ४४१६८८ ४३४१८०

लोकमंगल, बिबीदारफळ १५०९३१ १३०३५०

विठ्ठल कार्पोरेशन ५०१८९३ ३८६१५०

लोकमंगल, भंडारकवठे ४०३०६७ ३०६५१०

सिद्धनाथ ३१३६४९ २७१४५०

जकराया २६७७१४ १८३१५०

भैरवनाथ, विहाळ २५४३३१ २३१०००

इन्द्रेश्‍वर २६२५६० २७२७००

येडेश्‍वरी २६४५०४ २६२६००

मातोश्री २३०९३४ २१४८००

विठ्ठलराव शिंदे, करकंब ६०९०७४ ६४४७००

सीताराम महाराज ४२२१९६ ३८००००

ओंकार १८३७९३ १५७३४०

आवताडे शुगर ४०४४८५ ३७९२००

युटोपियन ४०२८०३ ३३९६८०

भैरवनाथ, लवंगी ३०१९१२ २९४३५०

भैरवनाथ, आलेगाव २०३२६० १८६१००

जयहिंद ७९३५०७ ६९००५०

बबनरावजी शिंदे ८२२२४० ८८४५५५

गोकुळ शुगर ६२६९५४ ५८४५२५

विठ्ठल रिफाइंड १९५९७३ १६०७००

व्ही.पी. शुगर्स ४४३९९६ ४१३३००

आष्टी शुगर १०९८६८ ८७७००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com