
Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसह खानदेशातील दोन अशा पाच जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविला आहे. या कारखान्यांनी बुधवारपर्यंत (ता. २९) ५५ लाख ९७ हजार १५३ टन उसाचे गाळप करत ४२ लाख ६ हजार १४५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या सर्व साखर कारखान्यांचा साखर उतारा सरासरी ७.५१ टक्के राहिला.
प्रादेशिक साखर सरसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या पाच जिल्ह्यांतील १३ सहकारी व ९ खासगी कारखाने मिळून २२ कारखाने यंदाच्या गाळप हंगामात सहभागी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील कारखान्याचा अपवाद वगळता इतर जिल्ह्यांतील कारखाने दैनंदिन गाळप क्षमतेच्या बाबतीत तुलनेने कमीच गाळप करत असल्याची स्थिती आहे.
१३ सहकारी साखर कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ४४ हजार १५० टन सरासरी असताना प्रत्यक्षात ३५ हजार ४७६ टन क्षमतेने हे कारखाने गाळप करीत आहेत. या सहकारी कारखान्यांनी बुधवारपर्यंत सरासरी २३ लाख ८ हजार ८२२ टन उसाचे गाळप केले.
यातून सरासरी ७.३९ टक्के साखर उतारा राखत १७ लाख ५ हजार ८२५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. दुसरीकडे नऊ खासगी कारखान्यांची सरासरी दैनिक गाळप क्षमता ४९ हजार ५०० टन प्रतिदिन असताना प्रत्यक्षात हे कारखाने ३७ हजार २१८ उसाचे गाळप प्रतिदिन करीत आहेत. या खासगी कारखान्यांना ३२ लाख ८८ हजार ३३२ उसाचे गाळप करत सरासरी टक्के साखर उताऱ्याने २५ लाख ३२० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
प्रतिदिन गाळप क्षमतेपेक्षा कमीच
नंदुरबार जिल्ह्यातील दोन कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता सरासरी १४००० टन असताना प्रत्यक्षात हे दोन्ही कारखाने सरासरी ९३३० टन उसाचे गाळप करीत होते. जळगाव जिल्ह्यातील एकमेव कारखान्याची क्षमता सरासरी २५०० टन प्रतिदिन गाळपाची असताना, प्रत्यक्षात हा कारखाना १ हजार ५ टन प्रतिदिन उसाचे गाळप करीत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ कारखान्यांची सरासरी प्रतिदिन गाळपक्षमता २३ हजार ५०० टन असताना हे सातही कारखाने सरासरी ११८०८ टन प्रतिदिन गाळपक्षमतेने सुरू होते. जालना जिल्ह्यातील चार कारखान्यांची सरासरी प्रतिदिन गाळप क्षमता १७००० टन असताना प्रत्यक्षात हे कारखाने त्यापुढे जाऊन १९४४० प्रतिदिन ऊस गाळप करीत होते. बीड जिल्ह्यातील ८ कारखान्यांची सरासरी गाळपक्षमता प्रतिदिन ३६ हजार ६५० टन असताना प्रत्यक्षात हे कारखाने ३१ हजार १७१ टन प्रतिदिन ऊस गाळप करीत होते.
जिल्हा... नंदुरबार
कारखाने...२
ऊस गाळप...६,७५,९०० टन
साखर उत्पादन...४,२२,३२५ क्विंटल
साखर उतारा... ६.२५ टक्के
जिल्हा... जळगाव
कारखाने...१
ऊस गाळप...८७,०६७ टन
साखर उत्पादन...८२,१७५ क्विंटल
साखर उतारा...९.४४ टक्के
जिल्हा... छत्रपती संभाजीनगर
कारखाने...७
ऊस गाळप...१२,२६,१५३ टन
साखर उत्पादन...११,५४,४७० क्विंटल
साखर उतारा...९.४२ टक्के
जिल्हा... जालना
कारखाने...४
ऊस गाळप...१३,०१,९२७ टन
साखर उत्पादन...१०,४१,४४० क्विंटल
साखर उतारा... ८ टक्के
जिल्हा...बीड
कारखाने...८
ऊस गाळप...२३,०६,१०६ टन
साखर उत्पादन...१५,०५,७३५
साखर उतारा...६.५३ टक्के
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.