
Ahilyanagar News : अहिल्यानगर विभागातील अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात यंदा आतापर्यंत २६ साखर कारखान्याच्या माध्यमातून यंदा उसाचे गाळप सुरू आहे. यंदा विभागात आतापर्यंत विभागात ५५ लाख २० टन उसाचे गाळप झाले आहे. सध्या दररोज एक लाख हजार टनापर्यंत उसाचे गाळप होत आहे. यंदा गतवर्षीपेक्षा १५ दिवस उशिराने गाळप सुरू आहे.
अहिल्यानगर विभागातील अहिल्यानगर जिल्ह्यात २२ व नाशिक जिल्ह्यात चार साखर कारखान्याच्या माध्यमातून यंदा उसाचे गाळप सुरु आहे. अहिल्यागरला ९४ हजार ७५० टन तर नाशिकला ९ हजार टन अशी विभागात १ लाख ११ हजार ५०० टन गाळप क्षमता आहे. सध्या विभागात १ लाख टनापर्यंत प्रतिदिन ऊस गाळप होत असून, ९० हजार क्विंटलच्या जवळपास साखर उत्पादन होतेय.
आतापर्यंत विभागात ५५ लाखांच्या वर ऊस गाळप झाला आहे. ४४ लाख ९२ हजार क्विंटलपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उताराही तसा कमीच आहे. अहिल्यानगरचा सरासरी साखर उतारा ८.१४, तर नाशिकमध्ये ८.१ टक्के साखर उतारा आहे.
अहिल्यानगरच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या अहवालानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक क्रांतिशुगरचा (पारनेर) १०.७८ साखर उतारा असून, त्यापाठोपाठ अगस्ती कारखान्याचा साखर उतारा १०.७७, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा १०.३८ आहे.
सध्या तरी पद्मश्री विखे पाटील साखर कारखान्याचा ६.५२ सर्वांत कमी साखर उतारा आहे. साखर उताऱ्यात दररोज कमी-जास्तपणा येत आहे. आतापर्यंत खासगी असलेल्या इंडीकॉन डेव्हलपर्स (अंबालिका) कारखान्याने सर्वाधिक ७ लाख ४६ हजार ८५० टनापेक्षा अधिक, गंगामाई कारखान्याने ४ लाख ५७ हजाराच्या पुढे तर सहकारी साखर कारखान्यात मारुतराव घुले कारखान्याने ४ लाख ४७ हजारांच्या पुढे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ३ लाख ८९ हजारांच्या पुढे ऊस गाळप केला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख टनांच्या जवळपास उसाचे गाळप झालेले आहे.
दर जाहीर कधी होणार ?
अहिल्यानगर विभागात उसाचे गाळप जोरात सुरू आहेत. मात्र अद्याप बहुतांश कारखान्यांनी उसाचा दर जाहीर केला नाही. शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही याबाबत गप्प आहेत. विधानसभा निवडणूक झाली. बहुतांश कारखानदार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. आता विधानसभा निवडणुकीचा माहोल संपला, गाळप हंगाम सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला, मात्र अजूनही दराबाबत फारसे गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.