Sugar Rate : साखरेचे दर स्थिरावले; मागणीत काहीशी घट

Sugar Supply : गेल्या पंधरवड्यापासून वाढलेले साखरेचे दर सध्या स्थिर आहेत. सध्या देशात साखरेस ३५०० ते ३७५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे. सध्या उन्हाळ्याचा उत्तरार्ध सुरू झाला आहे.
Sugar Rate
Sugar RateAgrowon

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
Sugar Production : कोल्हापूर : गेल्या पंधरवड्यापासून वाढलेले साखरेचे दर सध्या स्थिर आहेत. सध्या देशात साखरेस ३५०० ते ३७५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे. सध्या उन्हाळ्याचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. पंधरवड्यापूर्वी असणारी साखरेची मागणी काहीशी कमी झाली आहे. मागणी कमी झाली असली तरी दर मात्र अपवाद वगळता स्थिर असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

मार्च अखेरपर्यंत साखरेचे दर ३३०० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटल इतके होते. एप्रिलमध्ये उन्हाळा तीव्र झाल्यानंतर शीतपेय उद्योगातून साखरेला सातत्याने मागणी आली. यामुळे साखरेच्या दरात प्रतिक्विंटल दोनशे रुपयांपर्यंत वाढ झाली. १५ मे पर्यंत साखरेला चांगली मागणी होती. केंद्राने मे मध्ये उच्चांकी कोटा दिल्याने कारखान्यांनी जितकी म्हणून साखर विक्री होईल तितकी विक्री करण्यासाठी प्रयत्न केले.
एप्रिलपर्यंत लग्नाचे मुहूर्त मोठ्या प्रमाणात असल्याने या कालावधीतही साखरेला मोठी मागणी होती. मे मध्ये मात्र एप्रिलच्या तुलनेत अत्यंत कमी लग्न मुहूर्त होते. याचा काहीसा परिणाम साखरेच्या मागणीवर झाला. शीतपेय व आईस्क्रीम उद्योग वगळता सभासमारंभासाठी होणारी साखरेची मागणी कमी झाली. यामुळे साखरेच्या दराचे क्विंटलमागे दहा ते वीस रुपयांनी घट झाल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत आहे. मात्र किरकोळ घट वगळता साखरेचे दर स्थिर असल्याचे व्यापारी सूत्रानी सांगितले.

Sugar Rate
Sugar Market : पावसाचे आगमन लांबल्याने साखरेच्या मागणीत काहीशी वाढ

देशामध्ये यंदा चांगल्या मॉन्सूनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मॉन्सून वेळेवर सुरू झाला तर सध्याची मागणी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. असे असले तरी पुढचे किमान पंधरा दिवस तरी सध्याचे दर कायम राहतील, अशी शक्यता साखर उद्योगातून व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या महिन्यापासून साखर विक्रीबाबतचे नियम कडक केले आहेत. कारखान्यांनी दिलेल्या कोट्याइतकीच साखर विक्री करावी व त्याची ऑनलाइन नोंदणी करावी, असा आदेशच केंद्राने कारखान्यांना दिला आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत साखरेचे दर सध्या चांगले असल्याने अनेक कारखाने दिलेला विक्री कोटा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले.


विविध राज्यातील साखरेच्या प्रकारानुसार दर प्रतिक्विंटल, रुपये
राज्य....एस ३०....एम ३०
महाराष्ट्र..... ३६२० - ३६५०...३७०० - ३७३०
कर्नाटक.... ३८७५ - ३९००... -
उत्तर प्रदेश.... - ...३८७० - ३८९०
गुजरात....३६५१ - ३६७१...३७५५-३९१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com