Sugarcane Price : तोडगा निघाला, पण ऊसदर कधी जाहीर करणार ? 'स्वाभिमानी'चा हसन मुश्रीफांना सवाल

Swabhimani Shetkari Sanghatana Protest : ऊस दर आंदोलनात सरकारकडून मध्यस्थी करण्यात आली. त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यांकडून ऊस दराची घोषणा करण्याची मागणी होत आहे.
Swabhimani Shetkari Sanghatana Protest
Swabhimani Shetkari Sanghatana ProtestAgrowon
Published on: 
Updated on: 

Kolhapur News : ऊस दराच्या मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूरात महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने तोडगा काढल्यानंतर आज स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन कारखान्यांनी यंदाची पहिली उचल जाहीर करून मागील हंगामातील दुसरा हप्ता शेतकऱ्यांचा तातडीने देण्याची मागणी करण्यात आली.

Swabhimani Shetkari Sanghatana Protest
Sugarcane Rate : 'स्वाभिमानी'च्या ऊस दर आंदोलनाला शाहू महाराजांचा पाठिंबा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला ४०० रुपये दुसऱ्या हप्ता द्यावा आणि यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला ३५०० रुपये दर द्यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते. गुरुवारी कोल्हापूरात महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आला.

माजी खासदार राजू शेट्टींच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने मध्यस्थी करत ३ हजार रुपयांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला प्रतिटन १०० रुपये, तर ३ हजारापेक्षा अधिक दर दिलेल्यांनी ५० रुपये देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Swabhimani Shetkari Sanghatana Protest
Raju Shetti : अखेर राजू शेट्टींच्या लढ्याला यश, ऊस दराची कोंडी फुटली, १०० रुपयांवर अखेर तोडगा निघाला

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरळीत झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी मागील वर्षींचा दुसरा हप्ता जाहीर करण्यास मुश्रीफांनी सांगावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, अविनाश मगदूम,कसबा सांगाव ग्रामपंचायत सदस्य दिपक हेगडे, संतोष मगदुम,अनिल माळी,कुमार पाटील, निलेश चौगुले उपस्थित होते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com