Sugar Production : सातारा जिल्ह्यात ८६.७२ लाख क्विंटल साखर निर्मिती

Sugarcane Crushing Season : गेल्या दोन चार वर्षांपासून ऊस गाळप आणि साखर निर्मितीचे कोटीचे आकडे गाठणारे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांना यंदा कमी झालेल्या साखर उताऱ्याचा फटका बसला आहे.
Sugar Production
Sugar Production Agrowon
Published on
Updated on

Satara News : गेल्या दोन चार वर्षांपासून ऊस गाळप आणि साखर निर्मितीचे कोटीचे आकडे गाठणारे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांना यंदा कमी झालेल्या साखर उताऱ्याचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील १५ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असून, केवळ सह्याद्री व कृष्णा या दोन साखर कारखान्यांकडून सध्या गाळप सुरू आहे.

या वर्षीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत ८६ लाख ७२ हजार ३७२ क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. उसाचे घटलेल्या क्षेत्रामुळे या वर्षी एक कोटी क्विंटल साखर निर्मितीचा टप्पा कारखान्यांना गाठता आलेला नाही.

तोडणी वाहतूक विस्कळीत असूनही या वर्षीचा गळीत हंगाम तब्बल १७ कारखान्यांनी यशस्वी केला आहे. सह्याद्री व कृष्णा हे दोन कारखाने सुरू असून त्यांचा ही हंगाम अंतिम टप्प्यात आहे. या वर्षी खासगी कारखान्यांनी सर्वांधिक ४६ लाख १६ हजार ९४९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

Sugar Production
Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला

तर सहकारी साखर कारखान्यांनी कमी गाळप करूनही जादा साखर निर्मिती केली असून, त्यांना ११ ते १२ टक्क्यांपर्यंत साखर उतारा मिळाला आहे. सर्वाधिक ४९ लाख क्विंटल साखर निर्मिती सहकारी साखर कारखान्यांनी केली आहे. सर्वाधिक साखर उतारा अजिंक्यतारा कारखान्याला १२.६७ व रयत अथणी शुगरला १२.०८ टक्के साखर उतारा मिळाला आहे.

कारखानानिहाय गाळपाची स्थिती ऊस गाळप मेट्रिक टनांत व कंसात साखर निर्मिती क्विंटलमध्ये अशी आहे. सहकारी कारखाने : जवाहर-श्रीराम कारखाना ४५१८६७ (५२३३५०), कृष्णा कारखाना ११५०८८५ (१३११९६०), किसन वीर भुईंज ३९२९०४ (४१९७००), बाळासाहेब देसाई कारखाना २०५००१ (२४००४०), सह्याद्री कारखाना ८३१३००(९३४२७०), अजिंक्यतारा ५६८०००(६२५५२५), रयत अथणी शुगर ४४३९२३(५३४६७०), प्रतापगड-अजिंक्यतारा कारखाना १९१८०३ (२२३४००), खंडाळा कारखाना १३६९९० (१४३८५०).

Sugar Production
Sugarcane Crushing Season : मराठवाड्यासह खानदेशातील चौदा कारखान्यांचे गाळप आटोपले

खासगी कारखाने : दत्त इंडिया साखरवाडी ६५०५९५ (३४२१००), जरंडेश्‍वर शुगर १३४०५०० (११३४९००), जयवंत शुगर ५५०६४२ (४८२७५०), ग्रीन पॉवर शुगर १५६१२५ (१७४२५०), स्वराज्य ग्रीन पॉवर : ४७५१६१ (२४३२४०), शरयू ॲग्रो ५८८०५३ (४९७५३५), शिवनेरी शुगर्स कोरेगाव ४०५७८३ (४३८६६०), खटाव-माण ॲग्रो पडळ ४५००९० (४०१४००).

हंगामाची वैशिष्ट्ये....

गाळपात खासगी कारखाने आघाडीवर राहिले

साखर निर्मितीत सहकारी साखर कारखाने पुढे

अजिंक्यतारा व रयत अथणीला सर्वाधिक उतारा

जरंडेश्‍वर कारखान्याने केले सर्वाधिक गाळप

साखर निर्मिती : ८६ लाख ७२ हजार ३६५ क्विंटल

ऊस गाळप : ८९ लाख ७० हजार ६५२ मेट्रिक टन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com