Sharad Pawar : साखर कारखान्यांनी सीबीजी, यांत्रिक ऊसतोडणीकडे वळावे

VSI General Meeting : राज्यातील ऊस तोडणी व वाहतुकीत मजूर उपलब्धतेच्या अडचणी आहेत. त्यामुळे आता पारंपरिक ऊस लागवड पद्धतीत बदल करीत यांत्रिकीकरणाकडे वळावे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Pune News : राज्यातील ऊस तोडणी व वाहतुकीत मजूर उपलब्धतेच्या अडचणी आहेत. त्यामुळे आता पारंपरिक ऊस लागवड पद्धतीत बदल करीत यांत्रिकीकरणाकडे वळावे. साखर कारखान्यांनीही यांत्रिक ऊसतोड वाढवावी तसेच आर्थिक स्थिरतेसाठी सीबीजी प्रकल्प उभारावे, असा मोलाचा सल्ला ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार दिला.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (व्हीएसआय) ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (ता. ११) पुण्याच्या मांजरी बुद्रुक येथील मुख्यालयाच्या शिवारात झाली. या वेळी अध्यक्षस्थानावरून श्री. पवार बोलत होते. सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित राहिल्यामुळे कारखानदारांमध्ये चर्चा रंगली होती.

व्हीएसआयचे उपाध्यक्ष व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे जयप्रकाश दांडेगावकर, साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, माजी कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम,

कृष्णा साखर कारखान्याचे डॉ. इंद्रजित देशमुख, मांजरा सहकारी साखर कारखान्याचे दिलीपराव देशमुख, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील,

ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे नरेंद्र घुले पाटील, प्रकाश आवाडे यांच्यासह साखर उद्योगातील इतर पदाधिकारी तसेच ‘व्हीएसआय’चे सल्लागार शिवाजीराव देशमुख व महासंचालक संभाजीराव कडू पाटील व्यासपीठावर होते. मात्र सभेचे निमंत्रण असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित राहिले.

Sharad Pawar
Sharad Pawar : ...ती गॅरेंटी नाही, शेतकऱ्यांची अवस्थाही चिंताजनक; शरद पवार यांची टीका

राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना या वेळी ‘ऊस भूषण पुरस्कार’ देण्यात आले. तसेच उत्तम काम करणारे साखर कारखाने, त्यातील गुणवंत अधिकारी व व्हीएसआयमधील आदर्श कर्मचाऱ्यांना विविध पारितोषिकांनी गौरविण्यात आले.

Sharad Pawar
Sharad Pawar : देशातील जनता सध्या प्रचंड अस्वस्थ : पवार

श्री. पवार म्हणाले, ‘‘इथेनॉलकडे साखर कारखाने वळाले आहेत; मात्र आर्थिकदृष्ट्या व्यवहार्यता हवी असल्यास सीबीजी प्रकल्पांची उभारणी करावी लागेल. शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढवायचे असल्यास शुद्ध बेणे वापरावे लागेल. त्यासाठी १५० एकरांवर व्हीएसआयचा बेणे उत्पादन कार्यक्रम राबविला जातो.

याशिवाय आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी जालना जिल्ह्यात १२६ एकरांवर, तर विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नागपूर भागात १३५ एकरांवर व्हीएसआयचे काम चालेल. त्याद्वारे संशोधन, ऊस बेणे कार्यक्रम व इतर कृषी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.’’

शरद पवार यांनी साखर उद्योगाला दिल्या ‘या’ टिप्स

- शेतकरी व साखर कारखान्यांनी यांत्रिकीकरणाकडे वळावे.

- नव्या लागवडीसाठी शुद्ध ऊस बेण्याचा वापर करावा.

- मल्टिमायक्रोन्यूट्रिएंट, मल्टिमॅक्रोन्यूट्रिएंट, मायक्रोसोल ही द्रवरूप खते वापरा.

- ह्युमिक अॅसिड, जिवाणू खते, जैविक कीड नियंत्रके याचा वापर वाढवा.

-वसंत ऊर्जा जैवसंजीवक व हुमणी नियंत्रणासाठी बायोकंट्रोलर वापरा.

-यांत्रिक ऊसतोडणीतील पाचट प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी ब्लोअर प्रणालीचे निरीक्षण करावे.

Sharad Pawar
Pankaja Munde & Sharad Pawar Meeting : 'त्या' भेटीचा उद्देश साध्य झाला; ऊसतोड कामगारांच्या मागणीवर निघाला तोडगा

- सीबीजी उत्पादन वाढीसाठी प्रकल्प उभारा.

ऊस पुरवठा घटल्याबाबत शरद पवार यांनी दिली ‘ही’ कारणे

- हवामान बदल, दर्जेदार ऊस बेणे वापराबद्दल उदासीनता.

- अशास्त्रीय पाणी व्यवस्थापन, मातीची झीज.

- खालवला मातीचा पोत, खतांचा पुरेसा व वेळेत वापर न करणे.

- कीड-रोग व तणनियंत्रणाकडे दुर्लक्ष.

Sharad Pawar
Sharad Pawar : बिल्किस बानो प्रकरण महाराष्ट्राने गांभीर्याने घ्यावे

साखर उत्पादन ३१७ लाख टनांपर्यंत

देशाच्या साखर उद्योगाबाबत श्री. पवार यांच्याकडून सादर होणाऱ्या माहितीविषयी साखर कारखान्यांमध्ये सतत उत्सुकता असते. श्री. पवार म्हणाले, की गेल्या हंगामात ३२९.७० लाख टन साखर देशात तयार झाली. त्यातून ६१ लाख निर्यात, तर ४५ लाख टन इथेनॉलकडे वळवली गेली. साखर उत्पादन यंदा ३१७ लाख टनांपर्यंत जाईल. मात्र पाक व व्ही हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीसाठी १७ लाख टनांपेक्षा कमी साखर वळवण्यास मर्यादा घातली आहे. त्यामुळे बी हेवी मळीच्या साठा व विक्रीबाबत समस्या तयार झालेल्या आहेत.

आजपासून आंतरराष्ट्रीय साखर परिषद

व्हीएसआयमध्ये आजपासून (ता. १२) तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद होते आहे. उद्‌घाटनास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह २७ देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या वेळी ‘जागतिक साखर उद्योगातील शाश्‍वतता, आव्हाने व संधी’ या विषयांचा वेध घेतला जाईल. या निमित्ताने भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com