Sharad Pawar : बिल्किस बानो प्रकरण महाराष्ट्राने गांभीर्याने घ्यावे

Bilkis Bano Case : ‘‘बिल्किस बानोच्या आरोपींना माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारचा होता. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : ‘बिल्किस बानोच्या आरोपींना माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारचा होता. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, गुजरातमधील आरोपींना दिलासा देण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची असल्याचे म्हटल्याने सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे,’’ असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (ता. ९) दिला.

बलार्ड इस्टेट येथील पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. कल्याण येथील मेळाव्यात पवारांचे वय झाले आता थांबावे, असा सल्ला अजित पवार यांनी दिला होता. यावर ‘मला असले सल्ले देऊ नयेत,’’ असा पलटवार शरद पवार यांनी केला.

Sharad Pawar
Sharad Pawar : ...ती गॅरेंटी नाही, शेतकऱ्यांची अवस्थाही चिंताजनक; शरद पवार यांची टीका

श्री. पवार म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालात गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरणात निकाल देताना शिक्षामाफीचा अधिकार महाराष्ट्र सरकारचा असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच गुजरात सरकारने महाराष्ट्र सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे आणि याप्रकरणी राजकीय हस्तक्षेप करू न देण्याची जबाबदारी घ्यावी.’’

‘‘राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांची बैठक होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्रित काम कसे करावे, यासंबंधीची चर्चा होईल. ‘राष्ट्रवादी’च्या वतीने राष्ट्रीय महासचिव जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहतील. पक्षाच्या हिताची भूमिका मांडावी, असा मी सल्ला दिला आहे.

इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनी आगामी निवडणुकांना एकत्रित सामोरे जावे, यासाठी ही प्राथमिक बैठक असेल. यापुढे आणखीनही बैठका होतील. सध्या जागा कोणाकडे आहे. ती जागा कोणी लढवली तर कुणाला जास्त मते मिळतील, या आधारावर जागावाटप करताना विचार करावा. वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे,’’ असेही श्री. पवार म्हणाले.

Sharad Pawar
Pankaja munde : शरद पवार यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे यांचा थेट इशारा; म्हणाल्या, '...तर रस्त्यावर उतरावं लागेल'

‘...तोवर धाडी पडणार’

‘‘शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीने टाकलेल्या धाडीसंबंधी बोलताना पवार म्हणाले, ‘‘देशातील केंद्र सरकार बदलत नाही, तोवर अशा धाडी पडत राहणार. विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई होतच राहणार आहे. आमदार रोहित पवार, आमदार रवींद्र वायकर यांच्या संदर्भात देखील असेच होत आहे. सरळ असे दिसतेय की, सत्ताधारी पक्षावर कारवाई होत नाही.’’

‘वय वगैरे काढू नये’

‘‘अजित पवार आणि त्यांच्याबरोबर गेलेले नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे पक्षाबाहेर गेले आहेत. अजित पवार आणि त्यांना अशी भूमिका घ्यायला लावणाऱ्यांना पुन्हा पक्षात येऊ दिले जाणार नाही. याबाबत माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे, असे सांगत अजित पवारांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे.

मात्र, प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेबद्दलचा असेल तर, अनेक लोकांची उदाहरणे देता येतील. वय वगैरे काढण्याच्या गोष्टी काढू नये, माझा कार्यकाळ आहे, तोपर्यंत जनतेची सेवा करणे आणि सहकाऱ्यांना मदत करणे हे माझे काम आहे. त्यामुळे ते मी करत राहील,’’ असेही पवार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com