Sugarcane Season 2025 : धुळ्यातील उसाची नाशिक, गुजरातमधील कारखान्यांकडून खरेदी

Sugarcane Crushing : साक्रीतील पांझरा कान, दहीवद (ता. शिरपूर) येथील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना अनेक वर्षे बंद आहेत. कामगारांची देणी रखडली आहेत. हे कारखाने भाडेतत्त्वावर देण्याची मागील सतत झाली. पण दुर्लक्ष होत आहे.
Sugarcane Season
Sugarcane SeasonAgrowon
Published on
Updated on

Dhule News : जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाने बंद असून, त्यांची वाताहत झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील उसाची तोडणी किंवा खरेदी नाशिक, छत्रपती संभाजीनगर, गुजरात व नंदुरबारातील कारखाने करीत आहेत.

साक्रीतील पांझरा कान, दहीवद (ता. शिरपूर) येथील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना अनेक वर्षे बंद आहेत. कामगारांची देणी रखडली आहेत. हे कारखाने भाडेतत्त्वावर देण्याची मागील सतत झाली. पण दुर्लक्ष होत आहे.

Sugarcane Season
Sugarcane Season : पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस पट्टा बनला कुरुक्षेत्र

यामुळे जिल्ह्यातील उसाची खरेदी नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व गुजरातमधील कारखाने करीत आहेत. साक्री, शिरपुरात उसाची लागवड अधिक असते. या भागात कारखानाच नसल्याने अडचण आहे. किमान एक कारखाना सुरू करण्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

दहीवद येथील कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी मागील वर्षी सभासदांनी विशेष सर्वसाधारण घेऊन बहुमताने मंजुरी दिली होती. हा कारखाना सुरू करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू झाली होती. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे झाली. निविदाप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली.

इच्छुकांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला. परंतु या प्रक्रियेस प्रतिसाद मिळाला नाही. काही अडचणी आल्या, त्या दूर करणे शक्य नव्हते. यामुळे हा कारखाना सुरू होऊ शकला नाही. शिरपूर शेतकरी सहकारी साखर महत्त्वाचा असून, शिरपूर, साक्री व नजीकच्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यासाठी लाभदायी आहे. रोजगार उपलब्धता, आदिवासी, कष्टकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.

Sugarcane Season
Sugarcane Season : बावीस कारखान्यांकडून ५५.९७ लाख टन ऊस गाळप

ऊस पिकासाठी मुबलक पाणी, सुपीक जमीन आदी कारखान्याजवळ आहे. वाहतूक खर्चही कमी लागतो. या पार्श्‍वभूमीवर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठी पुन्हा विशेष सर्वसाधारण सभा घेतली जावी, असा मुद्दा ऊस उत्पादक उपस्थित करीत आहेत.

मागील वर्षी कारखाना भाडेत्त्वावर देण्यासाठी सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली. निविदाप्रक्रिया ऑनलाइन व निःपक्षपाती असते. यामुळे पुढे या प्रक्रियेस प्रतिसाद मिळू शकतो. कारखाना भाडेतत्त्वावर घेऊन चालविण्यासाठी इच्छुक तयार आहेत. कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बँकेच्या संचालक मंडळाचेही संपूर्ण सहकार्य आहे. यामुळे सुरू करायला हवा, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शिरपूर कारखान्यातील यंत्रणा खराब

शिरपूर साखर कारखाना शिरपूर तालुक्यातील सर्वांत मोठा सहकारी प्रकल्प आहे. कारखाना बंद स्थितीत असल्याने तालुक्यासह परिसरातील अर्थव्यवस्था फारशी गतिमान नाही. गेल्या १२ ते १३ वर्षांपासून कारखाना बंद असल्याने कारखान्याच्या मालमत्तेची झीज होऊन सर्व यंत्रणा खराब झाली. तसेच कारखान्याच्या बखळ जागेवर अतिक्रमणही झाले आहे. पांझरा कान कारखाना भंगाराच्या स्थितीत आहेत. त्यातील यंत्रणेची चोरी झाली आहे. त्याच्या जागेवर अतिक्रमणही झाल्याचे आरोप केले जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com