
Sugar Production : अहिल्यानगर ः अहिल्यानगर विभागातील २६ सहकारी व खासगी साखर कारखान्याचा साखर हंगाम आटोपला आहे. अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांत यंदा आतापर्यंत २६ साखर कारखान्यांच्या माध्यमातून एक कोटी तेरा लाख टन उसाचे गाळप झाले आहे. खासगीमधील आंबालिका तर सहकारीमधील स्व. भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने यंदा ऊस गाळपात आघाडी घेतली.
अहिल्यानगर विभागातील अहिल्यानगर जिल्ह्यात २२ व नाशिक जिल्ह्यात चार साखर कारखान्यांच्या माध्यमातून यंदा उसाचे गाळप सुरू आहे. अहिल्यानगरला ९४ हजार ७५० टन तर नाशिकला ९ हजार टन अशी विभागात १ लाख ११ हजार ५०० टन गाळप क्षमता आहे. मात्र विभागात यंदा बहुतांश वेळा क्षमतेपेक्षा अधिक ऊस गाळप झाले. यंदा गतवर्षीपेक्षा १५ दिवस उशिराने गाळप सुरू झाला तर दरवर्षीपेक्षा पंधरा दिवस आधीच गाळप हंगाम संपला.
यंदाच्या हंगामात १ कोटी १३ लाख टन उसाचे गाळप झाले असून, १ कोटी ३० हजार ७०२ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊसगाळपात सर्वाधिक १२,३३,२११ टन गाळप करून खासगी असलेल्या इंडीकाॅन डेव्हलपर्स (अंबालिका) कारखाना तर सहकारीत संगमनेरच्या स्व. भाऊसाहेब सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक ८,१४,२९० टन उसाचे गाळप करून अव्वल क्रमांक मिळवला. आता साखर कारखान्याचा गाळप हंगाम आटोपला आहे, असे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून सांगण्यात आले.
कारखानानिहाय उसाचे गाळप (टन) : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (कोपरगाव) ः ५४०८८१, कर्मवीर शंकरराव काळे (कोपरगाव) ः ६५०११६, गणेश सहकारी (राहाता) ः १९८७८५, अशोक सहकारी (श्रीरामपूर) ः ४४६८४०, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील (राहाता) ७०७०५०, सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) ः ४७६५८९, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (संगमनेर) ः ८१४२९०, लोकनेते मारुतराव घुले (नेवासा) ः ८११५८०, वृद्धेश्वर (पाथर्डी) ः २४९५५३, मुळा सहकारी (नेवासा) ः ६३२०९०, अगस्ती (अकोले) ः ३५०९३९, केदारेश्वर ः १२९३६०,
क्रांतीशुगर (पारनेर) ः २९८९३०, अंबालिका (कर्जत) ः १२,३३,२११, गंगामाई (शेवगाव) ः ८८०९७६, साईकृपा (देवदैठण) ः १०९८६३, गौरी शुगर (श्रीगोंदा) ः ७१५४१९, प्रसाद शुगर (राहुरी) ः ४९१६२०, बारामती अॅग्रो (हळगाव, जामखेड) ः २३८४०५, श्री गजानन शुगर ः ११७४०, सोपानराव ढसाळ (माळकुप, पारनेर) ः १८१३२५, स्वामी समर्थ माळेवाडी दुमाला (नेवासा) ः ९०५५९, कांदवा (दिंडोरी, नाशिक) ः ३३२७१४, अष्टलक्ष्मी (पळसे, नाशिक) ः १२७०२३, एस.जे, शुगर (रावळगाव, मालेगाव) ः ११४७२४, व्दारकाधीश (शेवरे, सटाणा) ः
४६३६२१.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.