Sugar Commissioner Notice : सहकारमंत्र्यांच्या कारखान्यास साखर आयुक्तांकडून नोटीस, ४२ गावांचा मुद्दा गाजणार

Bhimashankar Sugar : विशेष म्हणजे ही ४२ गावे शिरूर तालुक्यात असली तरी वळसे-पाटील प्रतिनिधित्व करीत असलेल्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत.
Sugar Commissioner Notice : सहकारमंत्र्यांच्या कारखान्यास साखर आयुक्तांकडून नोटीस, ४२ गावांचा मुद्दा गाजणार
Published on
Updated on

Pune Bhimashankar Sugar : शिरूर तालुक्यातील (जि.पुणे) ४२ गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सदस्य करण्यात यावे, अशी नोटीस राज्याच्या साखर आयुक्तालयाने संबंधित कारखान्याला पाठविली आहे. सहकार मंत्र्यांच्या कारखान्यास अशा प्रकारची नोटीस साखर आयुक्तालयाने दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना याबाबत विचारले असता, ही प्रशासकीय बाब असून याबाबत योग्य ती कार्यवाही करून अहवाल साखर आयुक्तांना पाठविण्यात येईल, असे स्पष्ट केले. "या शेतकऱ्यांना सभासदत्वाचे सर्व लाभ दिले जात आहेत, केवळ तांत्रिक मुद्यावर मतदानाचा अधिकार नाही. त्यावर मार्ग काढण्यात येईल," असेही वळसे-पाटील यांनी सांगितले.

विशेष म्हणजे ही ४२ गावे शिरूर तालुक्यात असली तरी वळसे-पाटील प्रतिनिधित्व करीत असलेल्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. याबाबत शेतकरी संघटनेचे ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली ढोमे यांनी अनेकवेळा विनंती करूनही भीमाशंकर सहकारी साखर कारखाना या ४२ गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सभासद करून घेत नसल्याची तक्रार साखर आयुक्तांकडे केली होती.

त्याचप्रमाणे या तालुक्यातील ऊस उत्पादकांना संबंधित कारखान्याचे सभासद करून घेण्याची सूचना देण्याची मागणी केली होती. ढोमे यांच्या तक्रारीवरून ही नोटीस देण्यात आली आहे.

Sugar Commissioner Notice : सहकारमंत्र्यांच्या कारखान्यास साखर आयुक्तांकडून नोटीस, ४२ गावांचा मुद्दा गाजणार
Drought Rural Maharashtra : दुष्काळाचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर, कर्जाच्या उचलीस शेतकरी धजावतोय

शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी प्रयत्न भीमाशंकर साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र आंबेगाव तालुका असले तरी कारखाना उभारणी वेळेस शेजारील शिरूर तालुक्यातील ४२ गावांतील शेतकऱ्यांकडून भाग भांडवलापोटी पाच हजार ते पंधरा हजार रुपये कारखान्याच्या वतीने गोळा करण्यात आले होते. त्यानंतर सुमारे १५ वर्षे या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप अधिकृत सदस्य बनवले गेले नव्हते.

त्यामुळे या शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी कारखाना घेत होता, मात्र सदस्यत्वाचे अन्य अधिकार मात्र या शेतकऱ्यांना मिळत नव्हते. ढोमे यांच्या म्हणण्यानुसार या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार नसल्याने कारखान्याचे संचालक निवडण्याचा अधिकार नव्हता. शेतकऱ्यांचा सभासद म्हणून मूलभूत अधिकार मिळावा यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com