Soil Fertility : मातीची काळजी, प्रयोगशीलता, बहुविध पद्धतीचा संगम

Multiple Cropping : हंगामी अन्नधान्ये, चारा, फळपिके, शेडनेट, आंतरपिके, देशी गोवंश, गोबरगॅस निर्मिती व परसगाव अशी विविध वैशिष्ट्यांनी भरलेली शेती.
Soil Fertility : मातीची काळजी, प्रयोगशीलता, बहुविध पद्धतीचा संगम
Published on
Updated on

संतोष मुंढे

Success story Of Multiple Cropping : हंगामी अन्नधान्ये, चारा, फळपिके, शेडनेट, आंतरपिके, देशी गोवंश, गोबरगॅस निर्मिती व परसगाव अशी विविध वैशिष्ट्यांनी भरलेली शेती. चिंचवडगाव (जि. बीड) येथील प्रल्हाद गवारे यांच्या संयुक्त कुटुंबाने एकीच्या बळावर मातीची काळजी घेत बहुविध, एकात्मिक व प्रयोगशील शेतीचा हा यशस्वी आदर्श तयार केला आहे. त्यातून समृद्धी निर्माण केली आहे.

बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्‍यात चिंचवडगाव शिवारात प्रल्हाद गवारे यांच्या एकत्र कुटुंबाची २८ एकर शेती आहे. सन २००० नंतर बारावीपर्यंतच्या शिक्षणानंतर प्रल्हादराव शेतीत आले.
याच शेतीच्या भरवशावर दहा सदस्यांच्या कुटुंबाचं अर्थकारण अवलंबून आहे. त्यांचे भाऊ हनुमंत जवळील संस्थेत प्राध्यापक आहेत. प्रल्हाद यांना पत्नी सौ. नंदिनी, भावजय तेजस्विनी यांची शेतीत मोठी मदत होते. आई सौ. सुमिंता व वडील शिवाजीराव आदींचे मार्गदर्शन होते.

Soil Fertility : मातीची काळजी, प्रयोगशीलता, बहुविध पद्धतीचा संगम
Soil Erosion : पश्‍चिम घाटातील जैवविविधता अन् मातीची धूप

सुधारित पीक पद्धती

-प्रयोगशील वृत्ती, खडतर कष्ट करण्याची तयारी व कुटुंबातील एकोपा या बळावर
आजपर्यंत किमान २७ पिके घेण्याचा अनुभव.
-यंदाचं म्हणाल तर सोयाबीन अधिक तूर १२ एकर, कपाशी ५ ते ७ एकर, बाजरी ३ एकर, भगर व राळा प्रत्येकी १० गुंठे, मधुमका ३ ते ४ एकर. तसेच रब्बीची पिके, दगडी ज्वारी, सुरती व कुचकुची हुर्डा. बांधावर केसर आंबा व नारळाची प्रत्येकी २० झाडे.
-१० वर्षांपासून परसबाग विकसित केली. त्यात सुमारे ७० पिके. त्यात विविध भाजीपाल्यांसह चिकू, आवळा, खजूर, सुपारी, केळी, शेवगा, चिंच, पपई.

शेतीची वैशिष्ट्ये ः

मोसंबीची बाग

मोसंबी सात एकर असून २ एकरांत २० वर्षांची तर पाच एकरांत पाच वर्षाची बाग आहे. जुन्या बागेत एकरी १५ ते १८ टन उत्पादन मिळते. व्यापारी जागेवरच खरेदी करतात. मोसंबीची बाग नवी असताना त्यात तूर, मुळा, भेंडी, मूग आदी सहा पिके घेऊन जमिनीची सुपीकता वाढवण्याचा प्रयत्न पाच वर्षे केला आहे.

शेडनेट शेती
दीड एकरात शेडनेटमध्ये ढोबळी मिरची आहे. त्याचे एकरी ५० टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे.
हैदराबाद, अहमदाबाद येथील व्यापाऱ्यांना जागेवरच विक्री होते. किलोला १० ते ६० रुपयांपर्यंत
दर मिळतो. मिरचीचे हार्वेस्टिंग झाल्यानंतर धैंचा किंवा तागाचे हिरवळीचे पीक घेतले जाते.
किंवा जमिनीला विश्रांती दिली जाते. त्यानंतर पुढील वर्षीच मिरचीचे पीक घेण्यात येते.

पॉली मल्चिंगवरील पिके

-उन्हाळ्यात घेतल्या जाणाऱ्या कलिंगड किंवा खरबुजाच्या पॉली मल्चिंग पेपपवर सात वर्षांपासून
कपाशी. त्याचे एकरी पाच ते कमाल २७ क्विंटल उत्पादन साध्य.
-मिरचीतही कलिंगड व खरबूज आंतरपीक यशस्वी केले. मिरचीची
काढणी झाल्यानंतर
त्याच मल्चिंगवर व त्याच्या वाळलेल्या झाडांचा आधार देत काकडी घेण्याचा प्रयोग यशस्वी केला.

Soil Fertility : मातीची काळजी, प्रयोगशीलता, बहुविध पद्धतीचा संगम
Soil Erosion : पश्‍चिम घाटातील जैवविविधता अन् मातीची धूप

ज्वारी व हुरडा

-काही क्षेत्र चारा पिकांसाठी राखीव ठेवले आहे.
-पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिवळी व दगडी ज्वारी एक-दोन ते अर्धा एकर. दुष्काळाचे सावट असल्यास बागायती दगडी ज्वारी घेण्यावर कटाक्ष. यंदा तीन एकरांवर ही ज्वारी.
-कोरडवाहू दगडी ज्वारीचे एकरी चार ते ५ क्‍विंटल. तर या बागायती ज्वारीचे ८ ते १२ क्‍विंटल उत्पादन मिळते.
-काही शेतकरी हुरडा पार्टी व्यवसाय करतात. त्यांना पुरवठा करण्यासाठी सुरती व कुचकुची हुरड्याचे उत्पादन घेऊन त्यातून उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे.

सेंद्रिय पद्धती व देशी गोवंश

-एकूण शेतीत ८० टक्के वापर सेंद्रिय निविष्ठांचा.
-पालापाचोळा. पिकांचे अवशेष, काडी कचरा, बायोगॅस स्लरी, घरीच वर्षभर उत्पादित गांडूळ खत यांचा वापर. त्यातून रासायनिक निविष्ठांवरील ४० ते ५० टक्के खर्च कमी केला. शिवाय जमिनीचे आरोग्य चांगले राखले.
-गीर, साहिवाल, राठी, लाल कंधारी व देवणी अशा पाच जातींच्या देशी गायींचे संवर्धन.
लहान-मोठी धरून १६ जनावरे. वर्षाला १० ते १५ ट्रॉली शेणखत मिळते.
-सुमारे १३ वर्षांपूर्वी १० घनमीटर क्षमतेचे ‘बायोगॅस’ युनिट उभारले. त्यातून घरच्या इंधनासाठी लागणारा गॅस सिलिंडरवरील खर्च शून्य झाला आहे.

शेतीची अन्य वैशिष्ट्ये

-५५ एचपी क्षमतेचा ट्रॅक्‍टर. आपत्कालीन स्थितीत त्याचे इंजिन व डायनॅमो आधारित वीजनिर्मिती.
त्यातून सिंचनाची सोय होते. आवश्‍यक अवजारांचीही सुविधा.
-सन २०१२ च्या दुष्काळात शेततळे घेतले. माजलगाव प्रकल्पातून पाइपलाइन. चार बोअरवेल्स. ठिबक व तुषार संचाचा वापर.
-प्रल्हाद कृषी विद्यापीठे, अंबाजोगाई कृषी विज्ञान केंद्राच्या कायम संपर्कात. त्यांनी काटेकोर संरक्षित शेतीसह विविध सुमारे ४० प्रशिक्षणे घेतली आहेत. त्यात नवी दिल्ली, राहुरी, परभणी येथील कृषी विद्यापीठे, बारामती केव्हीके आदींचा समावेश आहे.
-राज्य शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून २०१७ मध्ये गौरव.
-कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, सामाजिक संस्था स्तरावरही अनेक गौरव.

सामाजिक बांधिलकी

कोरोना काळात प्रल्हाद यांना शेतीत तब्बल पंधरा लाखांचे नुकसान सोसावे लागले. मात्र
झालेल्या थेट विक्रीतून त्यांनी चाळीस हजार रुपये कमावले. मात्र त्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साह्यता निधीसाठी त्यांनी २१ हजारांची मदत देऊन शेतकऱ्यांचे दातृत्व व सामाजिक बांधिलकी दाखवून दिली.

प्रल्हाद गवारे, ८२७५५२१५९७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com