IPS Success Story: मेंढरे हाकत यूपीएससी परीक्षेत मिळविले यश

Birdev Done Inspirational Journey: मेंढरे हाकत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेला यमगे (ता. कागल) येथील बिरदेव सिद्धाप्पा डोणे हा सध्या सोशल मीडियावरील सेलिब्रिटी ठरला आहे.
Birdev Siddappa Donne
Birdev Siddappa DonneAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News: मेंढरे हाकत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलेला यमगे (ता. कागल) येथील बिरदेव सिद्धाप्पा डोणे हा सध्या सोशल मीडियावरील सेलिब्रिटी ठरला आहे. मेंढरांची सेवा करत असतानाच त्याला आपण परीक्षेत यश मिळविल्याची बातमी कळाली आणि सारा माहोलच बदलून गेला.

बिरदेव हा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर परिसरातील रानावनामध्ये आपल्या आई-वडिलांसमवेत बकरी घेऊन जातो. त्याच ठिकाणी त्याला ही गोड बातमी समजली. आपण आयपीएस उत्तीर्ण होणार याची खात्री होती. त्यामुळे परत मेंढरामध्ये जाता येणार नाही म्हणून तो चार दिवसांपूर्वीच कर्नाटकात गेला आहे. तो उत्तीर्ण झाल्याचे समजताच अनेकांनी थेट बेळगाव जिल्हा गाठून त्याचा सत्कार केला.

Birdev Siddappa Donne
MPSC Success Story: शेतकऱ्याची लेक झाली न्यायाधीश

अतिशय खडतर रानोवनी हिंडत त्याने यशाला गवसणी घातली. या त्याच्या कष्टाची दखल विविध माध्यमांबरोबर सोशल मीडियानेही घेतली. त्याचे परिश्रम आणि साधेपणावर मुक्तपणाने स्‍तुतिसुमने सुरू आहेत. शेकडो फोन त्याला आले आहेत. निकालापूर्वी मेंढरांबरोबर फिरणारा एक साधा युवक काही तासांतच साहेब झाला. हा बदल त्यालाही अचंबित करणारा ठरला.

बिरदेवचे प्राथमिक शिक्षण यमगेच्या विद्या मंदिर या शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण जयमहाराष्ट्र हायस्कूल यमगे येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण त्याने मुरगुडच्या शिवराज विद्यालय ज्युनिअर कॉलेजमध्ये घेतले आणि इंजिनिअरिंगची पदवी पुण्याच्या सीओईपी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेतली. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी त्याने थेट दिल्ली गाठली. बिरदेवने दिल्लीत आयपीएस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीचे क्लास सुरू ठेवले.

Birdev Siddappa Donne
MPSC Success Story: भागू ते तहसीलदार भाग्यश्री...

या ठिकाणी त्याने दिवसातील २४ तासांमधील सर्वाधिक वेळ अभ्यासात खर्ची घातला. बिरदेव दिल्लीत यूपीएससीचा अभ्यास करत होता. महिन्याला दहा-बारा हजार रुपये त्याला खर्चासाठी पाठवणे वडिलांना कठीण होते. त्यामुळे हा नाद सोड आणि नोकरी कर असा तगादा वडिलांनी बिरदेवकडे लावला होता. मात्र आपण आयपीएस परीक्षेत यशस्वी होणारच ही जिद्द बिरदेवने बोलून दाखवली होती.

पाकव्याप्त काश्‍मीरबद्दल मला प्रश्‍न विचारला होता. त्यात मी संविधान डोळ्यासमोर ठेवून सातत्याने संवाद ठेवून हा प्रश्‍न सुटू शकेल, असे उत्तर दिले होते. माझ्या आवडी-निवडीत मेंढपाळांबद्दल उल्लेख केला होता. त्यावर आधारित मला मेंढी दूध किती देते, दूध उत्पादन वाढविण्यासाठी काय केले होते, असे प्रश्‍न विचारले होते. पारंपरिक व्यवसायाशी निगडित असल्याने झटपट उत्तरे दिली. मी आवडी-निवडीत कृत्रिमता दाखवत त्यांचा अभ्यास केला नव्हता. त्यामुळे ज्या गोष्टीत तुम्हाला रस आहे, त्याचा सखोल अभ्यास करून मुलाखतीला सामोरे जा अन् पाय जमिनीवर ठेवून उत्तरे द्या. यश तुमचेच आहे.
बिरदेव डोणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com