18-Hours Study : परभणीच्या कृषी विद्यापीठात सलग अठरा तास अभ्यास उपक्रम

Phule Ambedkar Jayanti : भारताच्या संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हे अखिल मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे.
18-Hours Study
18-Hours Study Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यापीठ ग्रंथालयात शुक्रवारी (ता. ११) सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सलग १८ तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा अध्यक्षस्थानी होते. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. विश्‍वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, डॉ. हिराकांत काळबांडे, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. संतोष कदम आदींसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

18-Hours Study
Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनाचा प्रश्न कायम

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की भारताच्या संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हे अखिल मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे.

18-Hours Study
Sustainable Agriculture : शाश्‍वत शेती व्यवसाय काळाची गरज

त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि ज्ञानार्जनाची तळमळ ही विद्यार्थ्यांनी अंगीकारावी. सलग अभ्यास हा उपक्रम केवळ एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांनी आयुष्यभर अभ्यासाची सवय ठेवावी असेही त्यांनी नमूद केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com