Women Empowerment : महिला सबलीकरणात ‘एसबीआय’चे भरीव योगदान

SBI Bank : महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून आर्थिक स्वावलंबी व्हावे, यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
Women Empowerment
Women Empowerment Agrowon
Published on
Updated on

Latur News : महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून आर्थिक स्वावलंबी व्हावे, यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. भारतीय स्टेट बँकेचेही महिला सबलीकरणाच्या कार्यात भरीव योगदान असून महिला बचत गटांना कर्जपुरवठा करण्यात बँक नेहमीच आघाडीवर राहिली आहे, असे मत जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केले.

भारतीय स्टेट बँकेच्या (स्टेट बँक ऑफ इंडिया) क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयाच्या वतीने आयोजित कर्जवाटप मेळाव्याच्या उद्‍घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी ठाकूर बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, बँकेचे महाव्यवस्थापक अनिरुद्ध कुमार चौधरी, बँकेच्या नांदेडच्या प्रशासकीय कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक प्रियाकुमार सरिगाला, लातूरच्या व्यवसाय कार्यालयाचे क्षेत्रीय प्रबंधक अमर सिंह, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, ‘उमेद’चे जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

Women Empowerment
Women Empowerment : महिलांचा कल वाढतोय उद्योजकतेकडे

जिल्हाधिकारी ठाकूर म्हणाल्या, की सर्वच क्षेत्रात महिलांनी स्वतःचे स्थान मजबूत केले आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक साक्षर व स्वावलंबी होऊन स्वतःचा व कुटुंबाचा उत्कर्ष साधावा.

Women Empowerment
Women Empowerment : बचत गटाच्या साथीने महिला झाल्या सक्षम

श्री. सागर म्हणाले, की भारतीय स्टेट बँकेने आजच्या मेळाव्यातून बचत गटांना दहा कोटींचे कर्जवाटप केले आहे. बचत गटांनी आपली उत्पादने बाजारामध्ये आणून त्याचे ब्रॅंडिंग, मार्केटिंग व पॅकेजिंग करण्यासाठी प्रयत्न करावेत. गटांच्या उत्पादनाना वाव मिळावा म्हणून ‘हिरकणी मार्ट’ सुरू करण्यात आला आहे.

श्री. चौधरी यांनी स्टेट बँक सदैव बचत गटांच्या पाठीशी असून गटांनी कर्जाचा उपयोग व्यवसायासाठी करण्याचे आवाहन केले. श्री. सरिगाला यांनीही मनोगत व्यक्त केले. श्री. अमर सिंह यांनी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील बचत गटांना तीस कोटींचे कर्जवाटप झाल्याचे आणि त्यातील ३८ टक्के वाटप एकट्या बँकेने करून केले असून वर्षाअखेरपर्यंत बँक ७० टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठेल, असा विश्वास व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com