Agriculture Subsidy : गोदाम, तेलघाणा सयंत्रासाठी अनुदान उपलब्ध

Agriculture Department : राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान, तसेच कडधान्य व खाद्यतेल अभियान (गळितधान्य) योजनेतील विविध लाभांसाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, गट यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Akola News : राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान, तसेच कडधान्य व खाद्यतेल अभियान (गळितधान्य) योजनेतील विविध लाभांसाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, गट यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

या योजनांच्या माध्यमातून विविध बाबींसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गोदाम सुविधा

अन्नधान्य उत्पादनाच्या सुधारित साठवणुकीसाठी व मूल्यवृद्धीसाठी गोदाम सुविधा आवश्यक आहे. योजनेत २५० टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान मिळते. इच्छुक अर्जदार शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनी यांनी केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना किंवा नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बँकेकडे प्रकल्प सादर करावा.

बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार पात्र ठरेल. बीज प्रक्रिया संच व गोदाम सुविधेसाठी जुलैच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा. जिल्ह्यासाठी प्राप्त लक्ष्यांकापेक्षा अधिक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीचे अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हास्तरीय अन्न सुरक्षा अभियान कार्यकारी समितीच्या मान्यतेने सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होते.

Agriculture Department
Agriculture Subsidy : ई-केवायसी केल्यानंतरही अनुदान मिळण्यास विलंब

मनुष्यचलित बीजप्रक्रिया यंत्र

वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गटामार्फत बीजप्रक्रिया यंत्र अनुदानावर देण्यात येते. या मनुष्यचलित ड्रम किंवा यंत्राच्या खरेदीसाठी किमतीच्या ५० टक्के किंवा प्रतियुनिट कमाल आठ हजार रुपये अनुदान मिळते. यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टलवर शेतकरी व शेतकरी गटांनी अर्ज करणे आवश्यक आहे.

सिंचन साधने आणि सुविधा

सिंचन साधने व सुविधांसाठी एचडीपीई पाइप किमतीच्या ५० टक्के किंवा ५० रुपये प्रतिमीटर मर्यादेत, तसेच पीव्हीसी पाइप किमतीच्या ५० टक्के ३५ रुपये प्रतिमीटर मर्यादेत, एचडीपीई लॅमिनेटेड वूव्हन ले फ्लॅट ट्युब किमतीच्या ५० टक्के २० रुपये प्रति मीटर मर्यादेत, खरेदीसाठी एका शेतकऱ्याला १५ हजार रुपये मर्यादेत अनुदान मिळते.

त्याचप्रमाणे, अल्प व अत्यल्पभूधारक, अनुसूचित जाती, जमाती, महिला आदी लाभार्थ्यांना विजेचा पंप संच, डिझेल पंप यासाठी किमतीच्या ५० टक्के किंवा कमाल १० हजार रुपये प्रति पंप संच याप्रमाणे, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याला किमतीच्या ४० टक्के किंवा कमाल ८ हजार रुपये प्रति पंप संच अनुदान मिळते. यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टलवर अर्ज आवश्यक.

Agriculture Department
Agricultural Approach : केंद्र सरकारचा शेतीविषयक दृष्टिकोन बदलणार?

ग्राइंडर, पल्व्हरायझर, पॉलिशर

अन्नधान्यासाठी ग्राइंडर, पल्व्हरायझर, पॉलिशर यासाठी अनु. जाती, जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक यांना किमतीच्या ५० टक्के किंवा कमाल ६० हजार रुपये प्रति नग, तसेच सर्वसाधारण गटातील लाभार्थ्याला किमतीच्या ४० टक्के किंवा कमाल ५० हजार रुपये प्रतिनग अनुदान. महाडीबीटीवर अर्ज आवश्यक आहे.

मनुष्यचलित टोकन यंत्र

गळितधान्य पिकाच्या पेरणीत सुलभता आणण्यासाठी व बियाण्याची बचत करण्याच्या हेतूने मनुष्यचलित टोकन यंत्र व मनुष्यचलित सायकलवर चालणारे सीड ड्रील याचाही अभियानात समावेश आहे. यासाठी अनुदान गटामार्फत किंवा वैयक्तिकही मिळते.

मनुष्यचलित टोकण यंत्र खरेदीसाठी १० हजार रुपये प्रतियंत्र व मनुष्यचलित सायकलवर चालणारे सीड ड्रील खरेदीसाठी पाच हजार रुपये प्रतियंत्र किंवा किमतीच्या ५० टक्के यात जे कमी असेल त्यानुसार अनुदान मिळते. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो.

छोटे तेलघाणा सयंत्र

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानात (गळितधान्य) उत्पादित मालाच्या मूल्यवृद्धीसाठी छोटे तेलघाणा सयंत्रासाठी अनुदान मिळते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प, अत्यल्प भूधारक व महिला शेतकऱ्यांसाठी किमतीच्या ६० टक्के किंवा कमाल एक लाख ८० हजार रुपये आणि इतर शेतकऱ्यांना किमतीच्या ५० टक्के किंवा १ लाख ५० हजार रुपये अनुदान मिळते.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार लुधियाना येथील सीआयपीएचईटी व तत्सम केंद्रीय संस्थेने तपासणी केलेल्या मिनी ऑईल मिल, तेलघाणी मॉडेलला अनुदान अनुज्ञेय आहे. त्यासाठी महाडीबीटीवर अर्ज करणे आवश्यक आहे.

बीज प्रक्रिया संच

राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान कडधान्य योजनेत शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बीजप्रक्रिया प्रकल्पाचा लाभ घेता येतो. उत्पादित बियाण्यावर प्रक्रिया करून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे उत्पादन करणारे शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बीज प्रकिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी यंत्रसामग्री, तसेच बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल १० लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते. त्यासाठी शेतकरी उत्पादक संघ किंवा कंपनीला बँकेकडे कर्जासाठी प्रकल्प प्रस्ताव द्यावा लागतो. बँकेने कर्ज मंजूर केल्यावर ते अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी पात्र होतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com