Wildlife Project : ‘‘वन्यजीव’ प्रकल्पांमधील जीवसृष्टीचा अभ्यास होणार’

Crop Pest : शेतीसाठी अपायकारक ठरणाऱ्या अनेक किडी पश्चिम घाटात आढळतात. त्याचा अभ्यास अलीकडेच पूर्ण केलेला आहे.
Wildlife
Wildlife Agrowon

Pune News : ‘‘शेतीसाठी अपायकारक ठरणाऱ्या अनेक किडी पश्चिम घाटात आढळतात. त्याचा अभ्यास अलीकडेच पूर्ण केलेला आहे. आता संरक्षित वन्यजीव प्रकल्पांमधील जीवसृष्टीचा नव्याने अभ्यास करण्यासाठी आम्ही हालचाली सुरू केल्या आहेत,’’ अशी माहिती भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या पुण्यातील पश्चिम प्रादेशिक केंद्राचे प्रभारी डॉ. बासुदेव त्रिपाठी यांनी दिली.

पुण्यातील केंद्राला ६५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शुक्रवारी (ता.२३) पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी डॉ. अपर्णा कलावटे, डॉ. एस. एस. कलमले, माध्यम माहिती कार्यालयाचे (पीआयबी) उपसंचालक महेश अय्यंगार व इतर शास्त्रज्ञ उपस्थित होते. “कृषी विकासात पश्चिम घाटातील जीवसृष्टीचा वाटा मोलाचा आहे.

Wildlife
Maharashtra Wildlife Board : राज्य वन्यजीव मंडळाची पुनर्रचना

फुलपाखरू किंवा साधी मधमाशीदेखील मानवी संस्कृतीला उपयुक्त आहे. परागीभवनात प्रमुख भूमिका बजावणारी मधमाशी नेमकी कोणत्या अवस्थेतून वाटचाल करते आहे, याचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. आमच्या केंद्राने आतापर्यंत महाराष्ट्रासह गोवा, गुजरात व कर्नाटकचा काही भाग, दादरा, नगर हवेली आणि दमण, दीव या केंद्रशासित प्रदेशांमधील ३० हजार जीवजंतूंचा अभ्यास पूर्ण केला आहे,” असे डॉ. त्रिपाठी म्हणाले.

पश्चिम घाटात विविध सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, मासे, शंख-शिपली, खेकडे, विंचू, कोळी, फुलपाखरे, भूंगेरे, चतुर, ड्रॅगनफ्लाय, डॅमसेफ्लाय, पित्त मिडजे, मुंग्या, मधमाश्यांच्या प्रजाती आढळतात. त्याविषयी अभ्यास व माहिती देण्याकरिता पुण्यातील आकुर्डी परिसरातील केंद्र कार्यरत आहे.

येथे विविध प्राण्यांच्या ३७५ प्रजातींचे ७५० हून अधिक नमुने असलेले एक संग्रहालय उभारले गेले आहे. याशिवाय पाच हजार पुस्तके, प्राणिशास्त्राशी संबंधित नियतकालिकांचे जैवविविधता वाचनालय तयार केले गेले आहे. त्याची मदत मराठी व इतर प्रांतातील विद्यार्थ्यांना होते आहे.

Wildlife
Wildlife Management : हंड्या-कुंड्या प्रकल्प क्षेत्रात वन्यजीव व्यवस्थापनला मान्यता

प्रादेशिक केंद्राने आतापर्यंत राज्यातील निशाचर प्राणी, वन्य प्राणी, संरक्षित क्षेत्रातील (मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) प्राण्यांचा अभ्यास केला आहे.

याशिवाय भीमाशंकर, चांदोली, कोयना, लोणार, फणसाड, राधानगरी, नाथसागर आणि उजनी येथील प्राणी परिसंस्थेचा अभ्यास केला आहे. “आम्ही १०० पेक्षा जास्त नव्या प्रजातींचा शोध लावला आहे.

या वर्षी आम्ही ‘बरोइंग फ्रॉग’, मेघालयातील बेडूक व गोड्या पाण्यातील खेकडा यांच्या प्रत्येकी एका प्रजातीचा शोध लावला. पुण्यात आता प्राण्यांचे जनुकीय अंगुलीमुद्रण (डीएनए बारकोडिंग) सुरू केले आहे. त्यामुळे वन्यजीव सामग्रींची ओळख शक्य झाली आहे,” असेही डॉ. त्रिपाठी म्हणाले.

पुण्यात होणार वन्यजीव न्यायवैद्यक प्रयोगशाळा

भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या पुण्यातील पश्चिम प्रादेशिक केंद्रात दोन नवे प्रकल्प आकाराला येण्याची शक्यता आहे. त्यात राज्यातील पहिली वन्यजीव न्यायवैद्यक प्रयोगशाळा तसेच प्राणी भांडार (फॅना रिझर्व्ह) उभारणी याचा समावेश आहे. केंद्राने मान्यता देताच या प्रकल्पांची कामे सुरू होतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com