Indigenous Seed : बियांबद्दल माहिती दिल्यास विद्यार्थी पर्यावरण अभ्यासक होतील

Desi Seed : लहान मुले आणि तरुणाईमध्ये बिजांचे महत्त्व अंकुरण्यासाठी कविता आणि काव्यांची रचना महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
Seed Consrvation
Seed ConsrvationAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘लहान मुले आणि तरुणाईमध्ये बिजांचे महत्त्व अंकुरण्यासाठी कविता आणि काव्यांची रचना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्यांना बियांबद्दल रोमांचकारी माहिती उपलब्ध करून दिली, तर विद्यार्थी पर्यावरण अभ्यासक होतील,’’ असे मत ओइकोस इकॉलॉजिकच्या पर्यावरण अभ्यासक केतकी घाटे यांनी व्यक्त केले.

गोएथ संस्था, फर्ग्युसन महाविद्यालय, बाएफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय बीजकथा परिसंवादाचा समारोप रविवारी (ता.२५) केतकी घाटे आणि मानसी करंदीकर यांनी केलेल्या ‘कवितेतील वनस्पती आणि बिया’ यावरील कवितांच्या सादरीकरणाने झाला.

या वेळी हरिवंशराय बच्चन, वसंत बापट, इंदिरा संत यांच्यासह आघारकर संशोधन संस्थेचे वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मंदार दातार यांच्या विविध वन्य वनस्पती आणि बियांवर केलेल्या कवितांचे या वेळी सादरीकरण करण्यात आले.

Seed Consrvation
Indigenous Seed Conservation : देशी वाणांचे केवळ संवर्धन नको, प्रत्यक्षात शेती होणे आवश्यक

विविध कवितांच्या सादरीकरणाबरोबरच सडे पठारे आणि त्यावरील फुलणाऱ्या फुलांचे पर्यावरणीय महत्त्व सांगताना, केतकी घाटे म्हणाल्या, ‘‘सात वर्षांनी एकदा फुलणाऱ्या कारवीकडे कीटक एवढे आकर्षित होतात, की ते कीटक इतर फुलांना दुर्लक्षित करतात. या कीटकांना कारवीच्या फुलांमधील मकरंद खूप आकर्षित करतो.

Seed Consrvation
Indigenous Seed Conservation : देशी बियाण्यांच्या संवर्धनाची चळवळ उभारणे गरजेचे

तसेच पठारांची निर्मितीच किटकांच्या परिसंस्थेसाठी केलेली आहे. पठारांच्या कातळावरील कमीत कमी मातीवर लहान लहान गवत आणि झाडांच्या जीवनाचे चक्र केवळ चारच महिन्यांचे असल्याने ते जिवाच्या आकांताने फुलत असतात. आणि यावरच किड्यांची जैवविविधता अवलंबून असते. यामुळे या सडे पठारे यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.’’

या वेळी वसंत बापट यांच्या बाभळीच्या झाडांचे गुणधर्म सांगणाऱ्या ‘अस्सल लाकूड, भक्कम पाठ,’ ‘लवलव हिरवी...गार पालवी...’ या कवितेचे सादरीकरण केले. तर, हरिवंशराय बच्चन यांच्या ‘पौंधे आज बने हे साकी...’ या कवितेचे सादरीकरण केले. तर इंदिरा संत यांच्या निवडुंगांचे महत्त्व आणि गुणधर्म सांगणाऱ्या कवितेचे सादरीकरण केले. तसेच मंदार दातार यांच्या पळस, पांगारा, बहावा, काटेसावर आणि रानमेव्यांचे औषधी गुणधर्मांचे महत्त्व सांगणाऱ्या कवितेचे सादरीकरण केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com