One District One Agri Mall : ‘एक जिल्हा, एक कृषी मॅाल’साठी पाठपुरावा करणार

Agriculture Market : एक जिल्हा, एक कृषी मॅाल या धोरणासाठी आपण पाठपुरावा करू, त्याशिवाय रोजगार हमी योजनेतून नवीन काय उपक्रम राबवता येईल, हेही पाहू, असे आश्‍वासन शीतल गोगावले यांनी बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे दिले.
Women Empowerment
Agriculture News Agrowon
Published on
Updated on

Solapur News : एक जिल्हा, एक कृषी मॅाल या धोरणासाठी आपण पाठपुरावा करू, त्याशिवाय रोजगार हमी योजनेतून नवीन काय उपक्रम राबवता येईल, हेही पाहू, असे आश्‍वासन शीतल गोगावले यांनी बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे दिले.

येथील यशस्विनी अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या कन्या शीतल गोगावले या आल्या होत्या. या वेळी त्या बोलत होत्या. यशस्विनी कंपनीच्या अध्यक्षा अनिता माळगे, योगेश माळगे, आत्माचे प्रकल्प संचालक खोत, स्मार्ट प्रकल्पाचे संचालक मदन मुकणे, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, आरती बसवंती, सरपंच अरुण साळुंखे, सागर सोलापुरे, चिदानंद बिराजदार, परमेश्वर सुतार, तंत्र अधिकारी श्रीमती कुंभार, सौरव राऊत, नागनाथ पाटील, कल्पना शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.

Women Empowerment
Agriculture Loss: खानवडीतील आगीत सीताफळाची झाडे भस्मसात

गोगावले म्हणाल्या, की शेतकऱ्यांच्या इथल्या प्रयोगाची पाहणी आपण केली, खूपच प्रोत्साहन देणारे, नाविन्यपूर्ण असे हे उपक्रम आहेत, यापुढेही महिला कंपनीला आपण सर्वोतपरी साह्य करू, महिलांच्या रोजगारासाठी प्रयत्न करू, असे त्या म्हणाल्या.

Women Empowerment
Agriculture AI : कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीत वापरासाठी सज्ज राहा

या वेळी माळगे यांनी स्मार्ट प्रकल्प, मॅग्नेट प्रकल्प, पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती, पंजाबराव देशमुख जैविक मिशन अशा योजनांची मोठी मदत आम्हाला होते आहे. श्री. अन्नउत्कृष्ट प्रकल्पाचे काम गतीने व्हावे, रोजगार हमी योजनेतून अल्पभूधारकांसाठी प्राधान्याने काम व्हावे, यासह विविध मागण्या मांडल्या. ज्योती जाधव यांनी सूत्रसंचालन केले. उषा पांगरकर यांनी आभार मानले.

विविध उद्योग, शेतीची पाहणी

शीतल गोगावले यांनी बोरामणीच्या यशस्विनी अॅग्रो प्रोड्युसर कंपनीची माहिती घेतलीच. पण सोलापुरातील पोलिस मुख्यालयातील सेंद्रिय शेती मॅाल, ज्वारी प्रक्रिया उद्योग करणारया सविता जुजगार, भाकरी उद्योगातील लक्ष्मी बिराजदार, प्रक्रिया उद्योगातील अर्चना रणवरे, सेंद्रिय शेती करणाऱ्या तांदुळवाडीच्या शेतकरी साधना प्रकाश भोसले, अलीमून पटेल, निर्मला माळी, शीला माताटे, शीला बोराळे, पार्वती कोरे यांच्या विविध प्रयोगांची पाहणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com