Electricity Employee Strike : वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप आश्‍वासनानंतर स्थगित

Latest Marathi News : महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर देवगिरी या निवासस्थानी बैठक झाली.
Electricity
Electricity Agrowon

Nagpur News : महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीची उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर देवगिरी या निवासस्थानी बैठक झाली. यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व वेतन थेट बँकेत जमा करण्यासह इतरही आश्‍वासन मिळाले. त्यामुळे कृती समितीने तूर्तास संप स्थगित केला आहे.

Electricity
Agriculture Electricity Issue : विहिरीत पाणी, पण विजेअभावी पिकांना देता येईना

फडणवीस म्हणाले, ‘‘कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत राज्य वीज नियामक आयोगाचे नियम तपासून तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा करू. वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वीज कंपन्यांमध्ये नोकरीत प्राधान्य मिळावे म्हणून वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यंत वाढवून सेवाज्येष्ठतेनुसार अतिरिक्त गुण देण्याचे प्रयत्न केले जातील. आयटीआय नसलेल्या परंतु सेवेतील कर्मचाऱ्यांना कमी न करता वीज कंपन्यांकडून विशेष अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र देत सेवेत ठेवले जाईल.’’

‘कंत्राटदाररहित कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी समितीचे काम सुरू आहे. त्याच्या अहवालानंतर निर्णय घेतला जाईल. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी व्यवस्था निर्माण केली जाईल. कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक असून कुणावरही अन्याय होणार नाही,’’ असेही फडणवीस म्हणाले.

Electricity
Agriculture Electricity : कृषी पंपाच्या पाच हजार नव्या वीज जोडण्या रखडल्या

या बैठकीला कृती समितीकडून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे राज्य अध्यक्ष नीलेश खरात, सागर पवार, नचिकेत मोरे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा, कृष्णा भोयर, चैनदास भालाधरे, वामन बुटले यांच्यासह २८ प्रतिनिधी उपस्थित होते.

...तर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार

राज्यात महावितरण, महापारेषण, महानिर्मितीमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या वेतनात गैरप्रकार करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून कठोर कारवाई करा, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांसह संबंधित कंपन्यांना केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com