
Washim News : दर्जेदार संत्रा उत्पादनात विदर्भात आघाडीवर येत असलेल्या वाशीम जिल्ह्यात यंदाच्या मृग बहराची तोडणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना प्रतिटन ३५ ते ४२ हजारांदरम्यान दर भेटत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
या जिल्ह्यात संत्र्याचे १२ हजार हेक्टरपर्यंत लागवड क्षेत्र पोहोचले आहे. मृग बहर घेण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदा केलेले नियोजन बऱ्याच अंशी फळाला आले आहे. अनेक बागा चांगल्या पद्धतीने बहरल्या होत्या. या फळांची तोडणी सध्या सुरू झाली.
बुधवारी (ता.१६) रिसोड तालुक्यातील वडजी गावात महेंद्र बोरकर यांची पहिल्यांदा बाग तोडणी सुरू झाली. या वेळी करडा कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विभाग प्रमुख निवृत्ती पाटील, शेतकरी महेंद्र बोरकर, राजेश बोरकर, विलासराव बोरकर, आर. के. बोरकर, गजानन बोरकर, दीपक ईडोळे, संत्रा खरेदीदार शेख शब्बीर शेख कदीर उपस्थित होते.
या वर्षी संत्र्याला बाजारपेठे चांगली मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रति टन ३५ ते ४२ हजारादरम्यान दर मिळतो आहे. अनेक शेतकऱ्यांनी आधीच क्रेटच्या दरानुसार बागांची विक्री केलेली आहे. यंदा दर व बहर चांगला असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
वाशीम जिल्ह्यात संत्रा उत्पादन व क्षेत्र वाढीसाठी करडा कृषी विज्ञान केंद्राचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या प्रयत्नांमुळे जिल्ह्यात क्षेत्र वाढले. खासकरून मृग बहर व्यवस्थापनासाठी दरमहा शिवारफेरी तसेच वेळोवेळी या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यात आले.
फळ काढणीचा पहिला हंगाम बाजारपेठेच्या दृष्टीने अधिक यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. केव्हीके वडजी हे गाव दत्तक घेतलेले असून तेथूनच संत्रा फळ काढणीला प्रारंभ झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.