Strawberry Farming
Strawberry FarmingAgrowon

Strawberry Farming : भीमाशंकर येथे वाढतेय स्ट्रॉबेरीचे क्षेत्र

Strawberry Cultivation : स्ट्रॉबेरी म्हटले की महाबळेश्वर आठवते, पण आता भीमाशंकर परिसरातील या १६ गावांमधील ४५ शेतकऱ्यांनी ६८ हजार स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली आहे.
Published on

Pune News : स्ट्रॉबेरी म्हटले की महाबळेश्वर आठवते, पण आता भीमाशंकर परिसरातील या १६ गावांमधील ४५ शेतकऱ्यांनी ६८ हजार स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली आहे. त्यामुळे याभागात लालचुटुक स्ट्रॉबेरीची शेती फुलणार आहे. यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.

मागील वर्षी या भागातील २५ शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीच्या ५० हजार रोपांचे वाटप आयसीआयसीआय फाउंडेशनकडून मोफत करण्यात आले होते. या लागवडीसाठी सेंद्रिय पद्धत अवलंबली होती.

Strawberry Farming
Strawberry Cluster : महाबळेश्‍वरच्या धर्तीवर भीमाशंकरला ‘स्ट्रॉबेरी क्लस्टर’

त्यामुळे खत व कीटकनाशकांचा खर्च नसल्याने केवळ मजुरीचा व पॅकिंगचा खर्च प्रत्येकी ८ हजार खर्च आला. स्ट्रॉबेरीचे उत्पन्न ३५ हजार ते दीड लाखापर्यंत मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. स्ट्रॉबेरीचे पीक घेऊन आर्थिक उत्पन्नाची किमया साधली आहे.

यावर्षी महाबळेश्वर, पुणे, नाशिक या भागात रोपे उपलब्ध न झाल्याने फाउंडेशनने नवी दिल्लीवरून रोपे मागवून या भागातील ४५ शेतकऱ्यांना प्रत्येकी दीड हजारप्रमाणे ६८ हजार रोपांची व्यवस्था करून दिली. या वेळी मात्र प्रत्येक शेतकऱ्याने रोपांसाठी १ हजार रुपये खर्च केला व रोपांचा उर्वरित खर्च फाउंडेशनने उचलला.

Strawberry Farming
Strawberry Farming : मेळघाटात स्ट्रॉबेरी ठरतोय शाश्वत उत्पन्नाचा स्रोत

स्ट्रॉबेरी लागवड प्रकल्प

आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी आयसीआयसीआय फाउंडेशनमार्फत मागील वर्षापासून या प्रकल्पास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद या प्रकल्पास मिळत आहे.

ठिबक सिंचन, मल्चिंग, जीवामृत, कीड, रोग काढणीपश्चात पॅकेजिंग व मार्केटिंगसाठी सुनील विधाटे, कृष्णा शिंदे कार्यरत असून सर्व टीम शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्‍न सातत्याने पुढे नेण्यासाठी प्रक्षेत्रावर जाऊन प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण होत आहे.

ही आहेत गावे आणि शेतकरी रोपांची संख्या

गाव /शेतकरी संख्या/ रोपांची संख्या.

म्हातारबाचीवाडी ३/४५००,

धुवोली २/३०००,

भोरगिरी २/३०००,

तळेघर ३/४५००,

चिखली ५/७५००,

जांभोरी ३/४५००,

राजपूर २/३०००,

पाटण ४/६०००,

पिंपरगणे १/१५००,

तिरपाड २/३०००,

डोण १०/१५५००,

नानवडे १/१५००,

कुशिरे बुद्रुक २/३०००,

पंचाळे खुर्द २/३०००,

पंचाळे बुद्रुक २/३०००,

अडिवरे १/१५००

एकूण १६ गावे/४५ शेतकरी/६८ हजार रोपे लागवड.

आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तर उंचावण्यासाठी भीमाशंकर परिसर ‘स्ट्रॉबेरीचे हब’ होण्यासाठी फाउंडेशनचे प्रयत्न सुरू आहेत.
- नितीन गुरव, जिल्हा विकास अधिकारी, आयसीआयसीआय फाउंडेशन.
मागील वर्षी आयसीआयसीआय फाउंडेशनमार्फत मी पहिल्यांदाच स्ट्रॉबेरीची लागवड केली. योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे मला यातून एक ते दीड लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न मिळाले होते. म्हणून या वर्षीही त्यांच्याकडून स्ट्रॉबेरीची रोपे घेतली आहेत. त्याची पूर्ण रक्कम भरली आहे. मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी मला यातून उत्पन्न मिळेल आता याची खात्री व विश्वास आहे.
- लक्ष्मण मावळे, सरपंच, पाटण (ता. आंबेगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com