Strawberry Farming : मेळघाटात स्ट्रॉबेरी ठरतोय शाश्वत उत्पन्नाचा स्रोत

Income From Strawberry Production : काही वर्षांपूर्वी प्रयोग म्हणून अवघ्या काही गुंठ्यांवर लागवड केलेल्या स्ट्रॉबेरीतून चांगला पैसा मिळत आहे.
Strawberry
Strawberry Agrowon
Published on
Updated on

Amravati News : काही वर्षांपूर्वी प्रयोग म्हणून अवघ्या काही गुंठ्यांवर लागवड केलेल्या स्ट्रॉबेरीतून चांगला पैसा मिळत आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांनी या पिकात सातत्य राखले आहे. लागवडीखालील क्षेत्र १० एकरांवर पोहचले आहे. चिखलदऱ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना सरासरी २०० ते २५० रुपये किलो दराने स्ट्रॉबेरीची विक्री होत आहे.

दुर्गम मेळघाटातील चिखलदरासह जंगल क्षेत्राला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. येथील शेतकऱ्यांना पर्यायी पिकातून उत्पन्न व्हावे, या उद्देशाने श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाकडून दहा वर्षांपूर्वी संशोधनात्मक प्रकल्प राबविण्यात आला. दोन वर्षांच्या या प्रकल्पासाठी आत्मा योजनेतून पाच लाख रुपयांची तरतूद केली होती.

Strawberry
Strawberry Farming : स्ट्रॉबेरी पिकासाठीच्या दोन शिफारशींना मान्यता

संशोधनाचे अहवाल सकारात्मक आल्यानंतर जिल्हा नावीन्यपूर्ण प्रकल्पातून ७८ लाख रुपयांची तरतूद करून ५० शेतकऱ्यांमार्फत प्रत्येकी १० गुंठे क्षेत्रावर लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले. यातून शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळाला. परिणामी अनुदान योजना संपल्यानंतरही शेतकऱ्यांनी स्वखर्चातून स्ट्रॉबेरी लागवडीवर भर दिला आहे.

Strawberry
Strawberry Farming : वातावरण बदलानं हंगाम सुरू, पण उत्पन्न घटल्याने बिघडलं गणित

पर्यटकांना स्ट्रॉबेरीची विक्री होते. २०० ते २५० रुपये किलोप्रमाणे दर मिळतो. ४५ ते ५० रुपयांना २०० ग्रॅमचे पाकीट विक्री होते. सातारा (महाबळेश्‍वर) भागातून गजानन शनवारे हे रोपांची संयुक्‍तपणे खरेदी करतात. परिणामी रोप निर्मितीसाठी या भागात संशोधन केंद्राची उभारणी व्हावी, अशी मागणी आहे.

शेतातून थेट तोड आणि विक्री

गजानन शनवारे, साधूराम पाटील, भीम निखाडे, नारायण खडके, किसन खडके, गंगाराम धांडे, नामदेव चव्हाण, मनोहर जांभेकर यांनी स्ट्रॉबेरी लागवडीवर भर दिला आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांचे शेत चिखलदरा तसेच इतर पर्यटनस्थळांच्या मार्गावर आहेत.

या ठिकाणी त्यांनी पर्यटकांना थेट शेतातूनच तोडणी करून खरेदीची सुविधा दिली आहे. त्यामुळे पर्यटकांचाही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशांक देशमुख यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com