थोडक्यात माहिती... १. हवामानातील बदल, पाणी साचणे आणि बुरशीजन्य रोगांमुळे फळगळ होते.२. झाडांना नियमित पाणीपुरवठा आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.३. पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी.४. गळून पडलेली व रोगट फळे व फांद्या त्वरित काढून नष्ट कराव्यात.५. बोर्डो मिश्रण, कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा संयुक्त बुरशीनाशकांची शिफारसीनुसार फवारणी करावी..Fruit Drop Control: राज्यातील काही भागात चांगल्याप्रकारे बहरलेल्या संत्रा फळाची सध्या फळगळ होत आहे. सारखे बदलणारे हवामान, अतिवृष्टी, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव, अन्नद्रव्यांची कमतरता यांमुळे ही फळगळ होत असल्याची शास्त्रज्ञांची माहिती आहे. मात्र योग्य उपाययोजना केल्यास शेतकरी या फळ गळतीवर नियंत्रण करु शकतात. .कारणेःनैसर्गिकरित्या संत्र्याच्या झाडाला गरजेपेक्षा जास्त फुलं येतात. त्यामुळे फळांमध्ये झाडावर टिकून राहण्याची शक्यता असते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या फुलांची आणि फळांची गळ होत असते.यासोबतच जास्त तापमान, उष्णता, अनियमित पाणीपुरवठा यामुळेही फळगळ होते. अगदी शेतात पाणी साचून राहिल्यामुळेही फळगळ वाढते. तर प्रामुख्याने संत्र्याची फळगळ ही बुरशीमुळे होते. कोलेटोट्रीकम ग्लोइओस्पोरिऑइड्स, बोट्रिओडिप्लोडिया थिओब्रोमी व अल्टरनेरिया या बुरशींमुळे संत्र्यांची फळगळ होते..लक्षणे:या बुरशींचा प्रादुर्भाव झाल्यास फळांच्या देठाला आणि देठ-साल यांच्या जोडावर काळपट डाग पडताता आणि कालांतराने तो भाग पूर्णपणे कुजतो. आणि झाडांची फळगळ दिसते. उशिरा झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळांची वाढ थांबते आणि फळं काळी पडतात. त्यामळे ती वजनानेही हलकी होऊन जातात. .Orange Pest : संत्री, मोसंबीवरील पाने खाणारी अळी, सायला व्यवस्थापन.उपाययोजनाफळगळ हा रोग विविध कारणांमुळे होतो त्यामुळे संत्रीच्या झाडाला निरोगी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन केल्यास ही फळगळ टाळता येते. फळगळच्या नियंत्रणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने मार्गदर्शन केले आहे. .संत्र्याच्या झाडांना वेळोवेळी पाणी पुरवठा करणे.संत्र्याच्या झाडांसाठी एकात्मिक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे. जमिनीतून आणि फवारणीद्वारे खत आणि अन्नद्रव्ये देण्यासाठी नियोजन करावे. पाण्याच्या पाळ्या जमिनीच्या मगदुरानुसार नियमित देण्यात याव्यात. ठिबक सिंचनाद्वारे ओलित करावयाचे असल्यास दररोज ओलित करावे..Orange Pest Management : संत्री, मोसंबीवरील कोळी किडीचे व्यवस्थापन.पावसाळ्यात बगिच्यात पाणी साचू देऊ नये. योग्य पद्धतीने लवकरात लवकर पाण्याचा निचरा करावा. यासाठी उताराच्या आडव्या दिशेने प्रत्येकी दोन ओळीनंतर ३० सेंटीमीटर खोली, ३० सेंटीमीटर खालची रुंदी आणि ४५ सेंटीमीटर वरची रुंदी असलेले चर खोदावेत.खाली गळून पडलेली फळे उचलून नष्ट करावीत. ती जास्त वेळ तशीच राहिल्यास त्यांच्याद्वारे बुरशीचा निरोगी फळांवर प्रसार होतो..संत्रा फळांची तोडणी झाल्यानंतर लगेच वाळलेल्या फांद्यांची छाटणी करावी किंवा पावसाळ्यापूर्वी रोगट व वाळलेल्या फांद्या काढून नष्ट कराव्यात. आणि लगेच झाडावर कार्बेन्डाझीम १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.संत्रा झाडाभोवती वारा प्रतीरोधक झाडे जसे शेवरी झाडाची लागवड करावी..रासायनिक नियंत्रण:रासायनिक नियंत्रणामध्ये बोर्डो मिश्रण ०.६ टक्का किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) ३ ग्रॅम किंवा ॲझोक्सिस्ट्रोबिन अधिक डायफेनोकोनॅझोल (संयुक्त बुरशीनाशक) १ मिलि किंवा कॉपर सल्फेट अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (ही बुरशीनाशके लेबल क्लेम शिफारशीत किंवा ॲग्रेस्को मान्यताप्राप्त आहेत.).वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):१. संत्र्याची फळगळ का होते? हवामानातील बदल, अतिवृष्टी, अन्नद्रव्य कमतरता आणि बुरशीजन्य रोगांमुळे.२. फळगळ टाळण्यासाठी सर्वात महत्वाची काळजी कोणती? पाणी साचू न देणे आणि नियमित पाणीपुरवठा करणे.३. संत्रा बागेत फळगळ रोखण्यासाठी छाटणी कधी करावी? पिकाची तोडणी झाल्यानंतर किंवा पावसाळ्यापूर्वी वाळलेल्या फांद्या काढाव्यात.४. फळगळ नियंत्रणासाठी कोणती बुरशीनाशके वापरावीत?बोर्डो मिश्रण, कॉपर ऑक्सिक्लोराइड, ॲझोक्सिस्ट्रोबिन + डायफेनोकोनॅझोल अशी शिफारस आहे.५. गळून पडलेली फळे शेतात ठेवली तर काय होते? त्यांच्याद्वारे बुरशीचा प्रसार होऊन निरोगी फळांनाही रोग लागू शकतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.