Nashik DCC Bank : नाशिक जिल्हा बँकेने सक्तीची कर्जवसुली, जमीनजप्ती थांबवावी

Loan Recovery : याआधी मालेगाव येथे बिऱ्हाड मोर्चा आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर अनेक शेतकरी संघटनांनी जिल्हा मध्यवर्ती बँकने सक्तीच्या कर्ज वसुली विरोधात व संपूर्ण कर्ज माफ करावे यासाठी आंदोलन केली.
Nashik DCC Bank
Nashik DCC Bank Agrowon
Published on
Updated on

Nashik News : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीची कर्ज वसुली व शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करणे तत्काळ थांबवावे. यासह शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावा या मागणीसाठी येत्या २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते प्रकाश शिंदे, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, ९३८ आदिवासी सहकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे , शेतकरी समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष भगवान बोराडे , शेतकरी समन्वय समितीचे सदस्य दिलीप पाटील यांनी दिली.

शुक्रवार (ता. २१) रोजी जिल्हाधिकारी जलज शर्मा याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. यामध्ये विविध मागण्या करण्यात नमूद करण्यात आल्या आहेत. गोल क्लब मैदानापासून मोर्चाला सुरवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा येऊन दिवसभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Nashik DCC Bank
Nashik DCC Bank : नाशिक जिल्हा बँकेविरुद्ध शेतकरी संघटना उभारणार लढा

याआधी मालेगाव येथे बिऱ्हाड मोर्चा आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर अनेक शेतकरी संघटनांनी जिल्हा मध्यवर्ती बँकने सक्तीच्या कर्ज वसुली विरोधात व संपूर्ण कर्ज माफ करावे यासाठी आंदोलन केली.तर शेतकरी समन्वय समिती व ९३८ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ जून २०२३ पासून १९ महिन्यापासून धरणे आंदोलन सुरू आहे, अशा सर्व शेतकरी संघटना आंदोलने करीत आहेत.

Nashik DCC Bank
Nashik DCC Bank : नाशिक जिल्हा बँकेच्या सामोपचार योजनेस सिन्नरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील ५६ हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा व जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीची कर्ज वसुली थांबवावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी नाशिक जिल्ह्यातील ५६ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

निवेदनावर शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, शेतकरी नेते प्रकाश शिंदे, ९३८ आदिवासी सहकारी संस्थेचे राज्यध्यक्ष कैलास बोरसे, शेतकरी समन्वय समितीचे भगवान बोराडे, शेतकरी समन्वय समितीचे सदस्य दिलीप पाटील, निवृत्ती गारे, दत्तू बोडके, भानुदास ढिकले, चंदू पाटील, अशोक आहेर, दत्तात्रय शेळके, उमेश शिंदे, भानुदास भडांगे, बाजीराव पाटील, पंढरीनाथ शिरसाठ, अक्षय सूर्यवंशी आदींसह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com