
Nashik News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राबविलेल्या नवीन सामोपचार योजनेस सिन्नर तालुक्यातील थकबाकीदार सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या योजनेतून १९ लाख रुपयांची वसुली झाली आहे. तरी थकबाकीदार सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी बँकेच्या वतीने केले आहे.
जिल्हा बँकेने राबविलेल्या ८ व १० टक्के सामोपचार योजनेस सिन्नर तालुक्यातील थकबाकीदार सभासदांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पीककर्जाला सरळ व्याजाने ८ टक्के व मध्यम मुदत कर्जाला १० टक्के सवलत देण्यात येत आहे.
सिन्नर तालुक्यात एकूण ५,१६४ थकबाकीदार सभासदांकडे ५३ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी असून सभासदांनी थकबाकीचा भरणा करावा व भविष्यात होणाऱ्या कायदेशीर कारवाईपासून मुक्त व्हावे, असे आवाहन सिन्नर तालुका उपनिबंधक संजय गिते यांनी केले. जिल्हा बँक, सहकारी संस्था व सहकार खाते यांनी राबविलेल्या सामोपचार योजनेच्या सवलतीचा लाभ होण्यासाठी थकबाकी भरण्यासाठी शेती संस्था व थकबाकीदार पुढे येत आहेत.
सिन्नर तालुक्यातील मेंढी वि. का. संस्थेचे मृत सभासद सदाशिव सोनू गिते यांचे वारसदार कल्याण सदाशिव गिते यांनी १९ लाख रुपयांचा भरणा केला असून त्यांना ६ लाख ७५ हजार रुपयांची सवलत मिळाली.
पीककर्ज ८ टक्के व मध्य मुदत कर्ज १० टक्के परतफेड योजना बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिंदे, सरव्यवस्थापक धनंजय चव्हाण, रत्नाकर हिरे व साहेबराव पवार तसेच विभागाचे पालक अधिकारी मिलिंद देवकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर विभागाचे विभागीय अधिकारी भरत आरोटे, बँक निरीक्षक प्रकाश गिते, विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच सोसायटीचे चेअरमन, सचिव ही सामोपचार योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.