Milk Adulteration : निफाडमध्ये भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त

Dairy Business : नाशिक ग्रामीण पोलिस यांनी संयुक्तरीत्या कारवाई करीत भेसळयुक्त दुधाचा ४८ हजार १६४ रुपयांचा साठा जप्त केला.
Adulterated Milk Products
Adulterated Milk ProductsAgrowon

Nashik News : तालुक्यातील बोकडदरे शिवारात अंकुश वसंतराव कातकाडे यांच्या घरातून नाशिक अन्न व औषध प्रशासन, नाशिक ग्रामीण पोलिस यांनी संयुक्तरीत्या कारवाई करीत भेसळयुक्त दुधाचा ४८ हजार १६४ रुपयांचा साठा जप्त केला.

Adulterated Milk Products
Dairy Adulteration : दुग्धजन्य पदार्थ भेसळी विरोधात अभियान राबवा

भेसळयुक्त पदार्थांपैकी हेमंत पवार (शहा, पंचाळे, ता. सिन्नर) यांनी दूध पावडरचा व सिन्नर, माळेगाव येथील मोहन आरोटे यांनी तेलसदृश पदार्थांचा पुरवठा केला असल्याचे सांगण्यात आले. यामुळे हे विक्रेते व पुरवठादार यांच्यावर अन्नसुरक्षा मानके कायद्यान्वये तपासासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Adulterated Milk Products
Milk Adulteration : दूध संकलन केंद्रावरील १२ हजार लिटर भेसळयुक्त दूध नष्ट

कारवाईत डेअरी परमिट पावडर १६ किलो (किंमत २,२४० रुपये), व्होल मिल्क पावडर ३२ किलो (किंमत ७,६८० रुपये), तेलसदृश पदार्थ १६८ लिटर (किंमत २५,७०४ रुपये) व भेसळयुक्त गाय दूध ४१८ लिटर (किंमत १२ हजार ५४० रुपये) असा एकूण ४८ हजार १६४ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. भेसळयुक्त व नाशिवंत दूध मानवी सेवनास येऊ नये, या उद्देशाने जागेवरच नष्ट करण्यात आले.

Adulterated Milk Products
Milk Adulteration : भेसळीच्या संशयावरून पनीर, मिठाईचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासानाने माहिती देताना सांगितले, की गोपनीय माहिती मिळाल्यावर अंकुश कातकाडे यांचे राहते घर, कातकाडे मळा, गट क्रमांक ३१/१/ब/२, बोकडदरे शिवार(ता. निफाड) येथे तपासणी केली असता या ठिकाणी एक व्यक्ती दुधाच्या प्लॅस्टिक कॅनमध्ये काही पदार्थ मिसळवत असल्याचे आढळून आले.

त्यानंतर पंचांसमक्ष परिसराची झाडाझडती घेतली. अन्नसुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी व योगेश देशमुख यांनी विभागाचे सहआयुक्त सं. भा. नारगुडे व सहायक आयुक्त उदय लोहोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.  विशेष पथक, नाशिक ग्रामीण व निफाड पोलिस ठाण्याचे पथक यांचे सहकार्य लाभले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com