Warana Milk : वारणा दूध संघातर्फे जातिवंत जनावरांचे प्रदर्शन, वारणा श्री किताबही मिळणार

Warana Dairy Vinay Kore : सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त वारणा दूध संघातर्फे जातिवंत जनावरांचे प्रदर्शन व परिसंवादाचे आयोजन
Warana Milk
Warana Milkagrowon

Warana Milk News : सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त धनत्रयोदशीदिनी शुक्रवारी (ता. १०) वारणा दूध संघातर्फे जातिवंत जनावरांचे प्रदर्शन व परिसंवाद आयोजित केल्याची माहिती संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. या वेळी म्हैस व गाय गटात 'वारणा श्री' किताब देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

'वारणा श्री' म्हैस पुरस्कारासाठी २५ हजार व 'वारणा श्री' गाय पुरस्कासाठी २१ हजार रुपयांची बक्षिसे आहेत. पहिल्या पाच व उत्तेजनार्थ क्रमाकांसाठीही रोख बक्षिसे आहेत.

शेतकऱ्यांनी अधिकाधिक जनावरे प्रदर्शनाकरिता नोंद करावीत, असे आवाहन संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केले.

शुक्रवारी सकाळी ९ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. नितीन मार्केडेय यांच्या हस्ते व डॉ. विलास आहेर, डॉ. मिलिंद मेश्राम, डॉ. अनिल उलेमाले, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. या वेळी डॉ. जे. बी. पाटील, डॉ. एन. एस. वडजे, डॉ. ए. पी. कोटगीरे, डॉ. अशोक पाटील, सुधीर कामेरीकर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com