Agriculture News : उत्पादन खर्च वाढला; हमीभावात वाढ करा, राज्य सरकारची कृषीमूल्य आयोगाला सूचना

Agriculture Production : राज्य सरकारने शेतमालाच्या उत्पादन खर्चाचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्राच्या उत्पादन खर्चाची तुलना इतर राज्यांशी होऊ शकत नसल्याची माहिती दिली.
Agriculture News
Agriculture Newsagrowon
Published on
Updated on

Maharashtra Agriculture Department : राज्य सरकार आणि केंद्रिय कृषी मुल्य आयोगाची काल(दि.११) रब्बी हंगाम (२०२५-२६) किंमत विषयक धोरण ठरविण्याबाबत बैठक झाली. या बैठकीत शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतमालाला हमीभाव देण्यासाठी कायदे बदला, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक घेण्यात आली.

राज्य सरकारने शेतमालाच्या उत्पादन खर्चाचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्राच्या उत्पादन खर्चाची तुलना इतर राज्यांशी होऊ शकत नसल्याची माहिती दिली. महाराष्ट्रात सर्वाधिक धरणे असूनही १८ते १९ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. येथील भौगोलिक परिस्थिती पाहता, सिंचनासाठी मोठा खर्च करावा लागतो, असे कृषिमंत्री मुंडे यांनी बैठकीत सांगितले.

देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात वाढत्या मजूरीने उत्पादन खर्च वाढत असल्याची माहिती देण्यात आली. अन्य राज्यांत क्विंटलला ९०० रुपये उत्पादन खर्च असेल, तर महाराष्ट्रात तो दर २,९०० रुपयांवर जातो. ही तफावत भरून काढण्यासाठी विद्यमान कायद्यानुसार शक्य नसेल तर केंद्र सरकारला शिफारस करून कायदे बदलले पाहिजेत, अशी भूमिका कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मांडली.

सोयाबीनला हवा किमान ५,१०० रु. दर सध्या राज्यात सोयाबीन आणि कापसाच्या दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो सोडविण्यासाठी आम्ही साडेचार हजार कोटींची तरतूद केली.

Agriculture News
Agriculture Manpower : कृषी क्षेत्रातील कौशल्याधारित मनुष्यबळाला जर्मनीतून मागणी

मात्र, आचारसंहितेमुळे ते देता आले नाही. मात्र, आता काही तरी निर्णय घ्यावा लागणार आहे. सोयाबीनसाठी किमान ५१०० रुपये दर हवा. तर कापूस आणि हळदीसाठी लवकरात लवकर हमीभाव जाहीर केले पाहिजेत, असे मुख्यमंत्री शिंदे बैठकीत म्हणाले.

या बैठकीला आयोगाचे अध्यक्ष वियज पॉल शर्मा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा व दमण राज्याचे कृषिमूल्य आयोगाचे सदस्य व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com