Gram Panchayat Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील १२२३ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत

Sarpanch Reservation : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ५ मार्च २०२५ ते ४ मार्च २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या १२२३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिले होते.
Gram Panchayat Membership
Gram Panchayat ElectionAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ५ मार्च २०२५ ते ४ मार्च २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या १२२३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिले होते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंचपदाचे आरक्षण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बुधवारी (ता.२३) काढण्यात आले.

जिल्ह्यातील २०२५ ते २०३० या काळात कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या एक हजार २२३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर केले आहे. अनुसूचित जाती प्रवार्गासाठी १५० असून, त्यातील अनुसूचित जमाती महिलांसाठी ७५ जागा राखीव आहेत.

Gram Panchayat Membership
Gondegaon Gram Panchayat : ‘गोंदेगाव’च्या ‘त्या’ निकालाला स्थगिती

अनुसूचित जमातीसाठी १७९, महिलांसाठी ९० जागा राखीव राहणार आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) ३३० जागा राखीव आहेत. त्यातील महिलांसाठी १६५ जागा राखीव आहेत. जिल्ह्यातील ६१२ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव राहणार आहे.

Gram Panchayat Membership
Gram Panchayat Election : सांगली जिल्ह्यातील ३४९ गावांच्या कारभारी होणार महिला

तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांना सोयीस्कर ठरणाऱ्या सभागृह, सांस्कृतिक भवनामध्ये आरक्षणाची सोडत दुपारी १२ वाजता काढण्यात आली. चिठ्ठी पद्धतीने सोडत काढण्यात आली.

तहसीलदार यांनी तालुक्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाकरीता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना एक द्वितीयांश सरपंचपदे महिला (अनुसूचित जाती महिला व अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला) यांच्यासाठी महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. अकोले, जामखेड, श्रीरामपूर, कोपरगाव, शेवगाव, श्रीगोंदे व अहिल्यानगर या तालुक्यांत गुरुवारी तर संगमनेर, कर्जत, राहुरी, राहाता, पाथर्डी, पारनेर व नेवासे या तालुक्यांमध्ये शुक्रवारी महिला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com