Gram Panchayat Election : सांगली जिल्ह्यातील ३४९ गावांच्या कारभारी होणार महिला

Sarpanch Reservation : ग्रामपंचायर्तीच्या आगामी निवडणुकांसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आल्याने ग्रामीण भागातील पुढाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे.
Women Leadership In Rural Development
Women Leadership Agrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण बुधवार (ता. २३) जाहीर करण्यात आले. त्यापैकी ३४९ गावांत महिलांना संधी मिळाली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील प्रमुख गावांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. आता ग्रामीण राजकीय आखाडा तापणार आहे.

ग्रामपंचायर्तीच्या आगामी निवडणुकांसाठी सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आल्याने ग्रामीण भागातील पुढाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. दरम्यान, काही ठिकाणी अपेक्षित असलेले आरक्षण न निघाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला, तर अनेक ठिकाणी अपेक्षित आरक्षण निघाल्याने इच्छुकांमध्ये उत्साह संचारला. सोडतीनंतर गावोगावी आरक्षणाची चर्चा सुरू झाली आहे. सोडतीनंतर आता गावोगावचे वातावरण तापणार आहे.

Women Leadership In Rural Development
Gram Panchayat Issues: स्वतंत्र ग्रामपंचायत हवीच! गावांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी मागणी

दरम्यान, काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी आरक्षणाला आक्षेप नोंदवला, परंतु अधिकाऱ्यांनी त्यांचे जागेवरच समाधान केले. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. समाज माध्यमांवरही आरक्षणाचे अपडेट शेअर केले जात होते. त्यामुळे ‘नेटिजन्स ॲक्टिव्ह’ असल्याचे दिसून आले

Women Leadership In Rural Development
Gondegaon Gram Panchayat : ‘गोंदेगाव’च्या ‘त्या’ निकालाला स्थगिती

मिरज तालुक्यात माधवनगर, बुधगाव, बेडग, बिसूर. जत तालुक्यात संख, उमदी. कडेगाव तालुक्यातील चिंचणी, रामापूर. तासगाव तालुक्यात कवठेएकंद, सावळज, आरवडे, बोरगाव. पलूस तालुक्यातील भिलवडी, रामानंदनगर, वसगडे, बांबवडे, कुंडल. शिराळा तालुक्यातील माळेवाडी, बिऊर, कोकरुड, शिरसी. वाळवा तालुक्यातील जुनेखेड, कापूसखेड, रेठरेधरण, शिरटे, ओझर्डे, कामेरी. खानापूर तालुक्यातील नागेवाडी, गोरेवाडी येथे इच्छुकांना धक्का बसला आहे.

या ग्रामपंचायती ठरतात लक्षवेधी

या मोठ्या ग्रामपंचायती असून सर्वसाधारण गटासाठी सरपंचपद आहे. यामध्ये आटपाडी तालुक्यातील सहा, खानापूर तालुक्यातील सहा, वाळवा तालुक्यातील नऊ, कडेगाव तालुक्यातील चार, शिराळा तालुक्यातील चार, कवठेमहांकाळ तालुक्यातील पाच, हिंगणगाव, तिसंगी, शिरढोण, नांगोळे, बोरगाव, तासगाव तालुक्यातील दोन गावे अशा ठिकाणी लक्षवेधी निवडणूक होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com