अडचणीतील कृषी क्षेत्रासाठी श्रीलंकेला हवी भारताची मदत

श्रीलंकेचे कृषिमंत्री महिंदा अमरावीरा यांनी अन्न सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारताची मदत मागितली आहे, असे श्रीलंकेच्या प्रकाशनाने म्हटले आहे.
Srilanka Crisis
Srilanka CrisisAgrowon

कोलंबो (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे कृषिमंत्री महिंदा अमरावीरा (Mahinda Amarveera) यांनी अन्न सुरक्षा (Food Security) आणि पर्यावरण संरक्षणासाठी (Environment Protection) भारताची मदत मागितली आहे, असे श्रीलंकेच्या प्रकाशनाने म्हटले आहे.

श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले यांनी नुकतीच श्रीलंकेच्या कृषिमंत्र्यांची भेट घेतली. देशातील अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या काळात कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी भारत श्रीलंकेला सतत पाठिंबा देत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक झाली. आर्थिक आणि राजकीय अशांततेमुळे अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत,

ज्यामुळे श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांची हकालपट्टी झाली. गेल्या आठवड्यात, भारताने एकूण ३.३ टन आवश्यक वैद्यकीय मदत श्रीलंकेला पुरविली. भारतीय उच्चायुक्तांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन महिन्यांत सरकार आणि भारतातील लोकांनी दान केलेल्या २५ टनांहून अधिक औषधे आणि वैद्यकीय सामग्रीची किंमत ३७० दशलक्ष एसएलआर इतकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणांतर्गत ही मदत पुरवण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com