Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Rabi Sowing : खानदेशात रब्बी हंगामात कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी काहीशी वाढणार आहे. पेरणीला गती आली आहे.
Jowar Sowing
Jowar Sowing Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात रब्बी हंगामात कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी काहीशी वाढणार आहे. पेरणीला गती आली आहे. तापी, अनेर, पांझरा, गिरणा आदी नद्यांच्या क्षेत्रातील पेरणी अधिक आहे. यंदा सुमारे १५ ते १८ हजार हेक्टरवर कोरडवाहू दादर ज्वारी पीक राहील, असे संकेत आहेत

पीक निसवण जानेवारीत होते. सध्या पीक वाढत आहे. काही भागात पीक अंकुरत आहे. तर अनेक भागात पेरणी सुरू आहे. कोरडवाहू दादर ज्वारी जोमात येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. अनेकांची पेरणी अपूर्ण असून, ती पूर्ण करून घेण्याच्या लगबगीत शेतकरी आहेत.

Jowar Sowing
Jowar Sowing : कळंबा परिसरात ज्वारी लागवडीकडे कल

खानदेशात यंदा सुमारे ३९ हजार हेक्टरवर दादर व अन्य बागायती संकरित ज्वारीची पेरणी होणार आहे. ही पेरणी मका पिकापेक्षा कमी असणार आहे. कारण ज्वारीचे दर मागील वेळेस कमी होते. तसेच पुढे चाऱ्याची समस्या कमी राहील, यासाठी ज्वारीच्या चाऱ्यासही मागणी कमी राहील.

यामुळे अनेकांनी मका व इतर पिकांची लागवड केली आहे. परंतु गिरणा, तापी व पांझरा नदीच्या क्षेत्रात अनेकांनी आपल्या कोरडवाहू क्षेत्रात पारंपरिक व चांगले उत्पादनक्षम पीक म्हणून ज्वारीची पेरणी केली आहे. कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी काहीशी वाढणार आहे. कारण पाऊस चांगला झाल्याने जमिनीत ओलावा आहे. पेरणीत मोठी वाढ यंदा होणार नाही.

Jowar Sowing
Rabbi Jowar : रब्बी ज्वारीसाठी कोळपणी का आहे महत्वाची?

जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, अमळनेर, भडगाव, चाळीसगाव, पाचोरा या भागांत ज्वारी पीक अधिक असणार आहे. भडगावातील खेडगाव व लगत ज्वारीचे मोठे क्षेत्र आहे. धुळ्यात शिरपूर, शिंदखेडा व धुळे तालुक्यात ज्वारी पीक असून, नंदुरबारमध्ये शहादा, तळोदा, नंदुरबार भागात ज्वारीची पेरणी बऱ्यापैकी होणार असल्याची माहिती मिळाली. अनेक शेतकरी यंदा दादर ज्वारीला एकदा सिंचन करण्याची व्यवस्थाही करीत आहेत. कारण एक पाणी दिल्यास पीक आणखी जोमात येईल, असे शेतकरी मानतात.

ज्वारीसाठी क्षेत्र नापेर

अनेक मंडलांत ओल्या दुष्काळाची परिस्थिती असल्याने यावर्षी ज्वारीची पेरणी वाढणार आहे. या परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी कोरडवाहू ज्वारीचे पीक पाणी उपलब्ध असतानाही घेण्याचे नियोजन केले आहे. अनेकांनी दादर ज्वारीसाठी क्षेत्र नापेर ठेवले होते. त्यात पेरणी झाली आहे. पीक तरारले आहे. या पिकाची वाढ गतीने होते. उंची १२ ते १३ फूट असते. यामुळे ज्वारीच्या पिकात माचवा करून त्यावर उभारून राखण करण्याचे चित्र पुढे दिसेल, अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com