Rice Harvesting : माणगावात भातकापणीला वेग

Rice Cutting : रब्बी हंगामातील भातशेती कापणीस आली असून काही दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे शेतकरी पुरता धास्तावला आहे.
Rice Harvesting
Rice HarvestingAgrowon

Raigad Rice Farming News : रब्बी हंगामातील भातशेती कापणीस आली असून काही दिवसांपासून बदलत्या हवामानामुळे शेतकरी पुरता धास्तावला आहे. लवकरच पावसाळा सुरू होणार असल्‍याने तालुक्‍यात कापणीची लगबग सुरू आहे.

यंदा रब्बी हंगामातील भात पिकाची ज्या शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी व लागवड केली, त्या शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही अनेक ठिकाणी भातपीक उभे असून हिरवेगार आहे.

पाऊस अवघ्‍या काही दिवसावर आल्‍याने तयार होण्याआधीच पीक कापायचे कसे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना सतावत आहे. ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी व लागवड सुरुवातीच्या कालावधीत केली, ते पीक तयार असून शेतात कापणी व मळणीची कामे सुरू झाली आहेत.

डोलवहाळ बंधाऱ्यातून सुटणाऱ्या कालव्याच्या पाण्यावर माणगाव तालुक्यातील बहुतांशी दुबार पीक घेतले जाते. यंदा कालव्याला पाणी उशिराने सोडण्यात आले, त्‍यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली होती.

Rice Harvesting
Raigad Sand Update : रायगड जिल्‍ह्यात लवकरच वाळू आगार

रब्बी हंगामातील भाताचे पीक हमखास उत्‍पन्न देणारे असल्‍याने शेतकरी आवर्जून लागवड करतो. यंदाच्या रब्बी हंगामात तालुक्यातील १०२ हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड झाली. ज्या शेतकऱ्यांनी कालव्याला पाणी आल्याबरोबर भात पिकाची पेरणी केली होती, ते पीक तयार होऊन कापणीची कामे जोरात सुरू आहेत.

मात्र ज्‍यांनी उशिराने पेरणी व लागवड केली, अशी भातपिके अजूनही हिरवेगार आहेत. दुसरीकडे शेतातील खरीप हंगामाच्या पेरणीची लगबगही सुरू केली असून बांधबंदिस्ती, नांगरणी, तसेच बी. बियाणे यांची खरेदी आदी कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

तालुक्यातील पाणसई, कालवण, दाखणे, इंदापूर, मुठवली, कशेणे, माणगावसह अनेक गावातील शेतकऱ्यांची रब्बी पिकाची कापणीत व्यग्र आहे.

खरिपाच्या पेरणीची तयारी

यंदा माणगाव तालुक्यात खरीप हंगामासाठी १३ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाणार असून शेतकऱ्यांनी पेरणी पूर्व कामाला गती दिली आहे.

जे शेतकरी फक्त खरीप हंगामावर अवलंबून आहेत, त्‍यांनी बांधबंदिस्ती, कुंपण, भाजनावळ, राब टाकणे या सारखी अनेक शेतीची कामे सुरू केली आहेत. ही कामे अखेरच्या टप्प्यात असून शेतकरी मेघराजाची वाट पाहत आहे.

Rice Harvesting
Rice Seed : भात बियाणे वेळेपूर्वीच उपलब्ध
भातशेती कापणीस तयार आहे. काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असून सतत वातावरण बदलत आहे. त्‍यामुळे कापणीवर संकट ओढावले असून मजूर मिळत नसल्‍याने शेतकरी कुटुंब, नातेवाईक मित्रमंडळींसह कामात गुंतला आहे. ढगाळ वातावरणामुळे कापणी केलेले भातपीकावरही अवकाळीचे संकट घोंघावत आहे.
बाळाराम भोनकर, शेतकरी माणगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com