Soyabean Rate : सोयाबीनला येणार झळाळी; निर्यातीमुळे राहणार तेजी

Soyabean Price : सोयाबीनला हमीदरापेक्षा अधिक भाव मिळत आहे. गुरुवारी (ता. १६) सोयाबीनला ५ हजार ७८ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
soyabean
soyabeanAgrowon
Published on
Updated on

Amravati News : गेला आठवडाभर सामसूम राहिलेली बाजार समिती शुक्रवारपासून (ता. १७) पुन्हा गजबजण्यास सुरुवात झाली आहे. शेतीमालाची आवक पूर्ववत सुरू झाली आहे. लिलाव पुकारण्यात आल्याने यार्डात शेतकऱ्यांनी चांगलीच गर्दी केली. दरम्यान, सोयाबीनला हमीदरापेक्षा अधिक भाव मिळत आहे. गुरुवारी (ता. १६) सोयाबीनला ५ हजार ७८ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

soyabean
Soyabean Seed : बियाण्यांसाठीच्या सोयाबीनचे दर ५ हजारांवर

सध्या खरिपातील सोयाबीन व मक्याचा हंगाम सुरू आहे. दिवाळीपूर्वी सोयाबीनची चांगली आवक राहिलेल्या स्थानिक बाजार समितीत सध्या आवक मंदावली आहे. दिवाळीपूर्वी चार लाख क्विंटलच्या जवळपास आवक नोंदविण्यात आली आहे. प्रारंभी कमी असलेले भाव नंतर २०० ते ३०० रुपयांनी वधारून हमीदराच्या वरपर्यंत गेले आहेत. मात्र यंदा सोयाबीनच्या उत्पादनाची सरासरी घसरल्याने आवक कमी झाल्याचे खरेदीदारांनी सांगितले.

soyabean
Soyabean Rate : सोयाबीन दर पडल्यानंतर 'स्वाभिमानी' आक्रमक, मालेगाव शहरात कडकडीत बंद

बियाण्यांसाठी कंपनी प्रतिनिधी बाजारात आल्याने बियाणे सोयाबीनचे दर ५ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपयांवर गेले आहेत. तर साठवणूकदार आल्याने हमीदरापेक्षा अधिक दर झाले आहेत. एका सप्ताहाने उघडलेल्या बाजार समितीत गुरुवारी सोयाबीनला ५ हजार ते ५१५६ रुपये भाव मिळाला. आवक मात्र ९ हजार २७६ पोत्यांचीच झाली.

सोयाबीनच्या दरामध्ये आणखी सुधारणा होण्याची शक्यता खरेदीदारांनी वर्तविली आहे. भारतातील सोयाबीनला परदेशात मागणी वाढल्याचे कारण त्यांनी दिले असून नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये भावात तेजी राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

साडेपाच हजारांचा पल्ला गाठणार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय सोयापेंडला मागणी वाढणार आहे. यंदा उत्पादनात घट आहे. त्याचा परिणाम भाव वाढण्यात होणार आहे. सोयाबीनचा भाव पुढील दोन महिन्यांत ५ हजार ५०० रुपयांचा पल्ला पार करण्याची शक्यता आहे, असा अंदाज सोयाबीन खरेदीदारांनी वर्तविला आहे. भारतीय निर्यातदारांनी आतापर्यंत तीन लाख टन सोयापेंड निर्यातीचे करार केले आहेत. ही निर्यात डिसेंबर अखेरपर्यंत होईल.

बाजार समिती गजबजली

दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर बाजार समितीमधील बंद असलेले व्यवहार गुरुवारी (ता. १६) व्यवहार सुरळीत झाले. बाजार समितीत सोयाबीनची सर्वाधिक ९ हजार २७६ पोत्यांची आवक झाली. १८४ पोती हरभऱ्याची आवक नोंदविण्यात आली. मक्याचा हंगाम असला, तरी त्याची केवळ २० पोती आवक झाली. तेजीत असलेल्या तुरीची ३६, तर गव्हाची ३२ पोती आवक झाली. गुरुवारी एकूण ९ हजार ५४८ पोत्यांची आवक नोंदली गेली. त्यामुळे बाजार समिती गजबजली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com