Kharif Sowing : सोयाबीन, मक्याला सर्वाधिक पसंती

Soybean Sowing : यंदा जूनपासून पावसाचे आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी वाफसा अवस्थेनुसार टप्प्याटप्प्याने पेरणी केली आहे.
Maize Sowing
Maize SowingAgrowon
Published on
Updated on

Nashik News : यंदा जूनपासून पावसाचे आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी वाफसा अवस्थेनुसार टप्प्याटप्प्याने पेरणी केली आहे. सरासरीच्या तुलनेत चांदवड, बागलाण, निफाड, येवला, मालेगाव, कळवण, देवळा व दिंडोरी तालुक्यांत पेरा यंदा वाढला आहे. तर नांदगाव, तालुक्यात १०० टक्के पेरा पूर्ण झाला. सिन्नर, नाशिक तालुक्यात पूर्ण पेरा झालेला नाही.

सरासरीच्या तुलनेत सर्वांत कमी पेरणी पेठ तालुक्यात आहे. जिल्ह्यात सोयाबीन व मका पिकाला सर्वाधिक पसंती असल्याचे चित्र आहे. यंदा पावसाची हजेरी पेरणीदरम्यान नसताना काही दिरंगाई झाली. मात्र अधूनमधून होणाऱ्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या. मात्र पावसाने मोठा आधार दिला. जिल्ह्यात खरीप पिकांचे सरासरी पेरणी क्षेत्र ६,४२,७७१ हेक्टर आहे.

Maize Sowing
Kharif Sowing : ज्वारी, उडीद, मुगाच्या पेरणीत लक्षणीय घट

प्रत्यक्षात ६,५७,५७४.७५ हेक्टरवर पेरणी अंतिम झाली आहे. यामध्ये मका, सोयाबीन, मूग व भात या पिकांची १०० टक्क्यांहून अधिक पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या माहितीवरून दिसून येत आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पेरणी चांदवड तालुक्यात आहे. शेतकरी बाजरीसारख्या पिकाकडून आता नगदी पिकांकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात मकाचे सरासरी क्षेत्र २,१७, १०८ हेक्टर आहे. प्रत्यक्षात २,७८,३५३ हेक्टरवर यंदा लागवड आहे.

ही टक्केवारी १२८.२१ आहे. सोयाबीनच्या पिकातही वाढ झाली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ७६,२३५ हेक्टर असून प्रत्यक्षात पेरणी १,१६,५९१ हेक्टरवर म्हणजेच १५२.९४ टक्के झाली आहे. तृणधान्य पिकात बाजरी, नाचणीचे क्षेत्र घटले आहे. बाजरी ५०.३९ टक्के, नाचणी ७०.१ टक्के तर ज्वारीचा पेरा अवघा २६.३४ टक्के इतका आहे. कडधान्य पिकात मुगाची पेरणी ११९.३६ टक्के झाली आहे.

Maize Sowing
Kharif Sowing : जालना, बीडमध्ये सरासरीहून अधिक पेरणी

तर तूर ४९.३३ टक्के, उडदाचे क्षेत्र ५५.८४ म्हणजेच निम्म्यावर आहे. भाताची पेरणी १०७. ६३ टक्के झाली आहे. गळीतधान्य पिकात सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे. तर भुईमूग ६४.४९ टक्के, कारळे अवघे २२ टक्के आहे. तेलबियांचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे. कापूस लागवड ७८.७४ टक्के क्षेत्रावर झाली आहे.

तालुकानिहाय पेरणी स्थिती

तालुका सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी (हेक्टर) टक्केवारी

मालेगाव ९५,२७८ ९८,५३२ १०३.४२

बागलाण ६३,९८५ ७०,३७१ १०९.९८

कळवण ३९,४६७ ४०,६१४ १०२.९१

देवळा ३०,१७५ ३०,९३७.९ १०२.५३

नांदगाव ६०,४६८.८१ ६१,०४८ १००.९६

सुरगाणा ३१,४३९.५८ ३०,७७५.७१ ९७.८९

नाशिक १२,४१४.०५ ११,५८४.३ ९७.८९

त्र्यंबकेश्र्वर २४,११८.०३ २३,४७३.२४ ९७.३३

दिंडोरी १७,९६८.१९ १८,२५८ १०१.६१

इगतपुरी ३३,०५३.४४ ३३,१०३.०४ १००.१५

पेठ २७,४४९ २१,६५९ ७८.९१

निफाड ७०,१३५.०२ ७४,९४७ १०९.७८

सिन्नर ६२,११३.९३ ६०,८२८.७ ९७.९३

येवला ७०,१३५.०२ ७४,४९७ १०६.८६

चांदवड ४०,९४४.१५ ४५,४७५ १११.०७

एकूण ६,४१,७७१.८८ ६,५७,५७८ १०२.४६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com