Kharif Sowing : जालना, बीडमध्ये सरासरीहून अधिक पेरणी

Kharif Season : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९८.५७ टक्के, जालना जिल्ह्यात १०१.१७ टक्के तर बीड जिल्ह्यात १०२.५२ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या तीन जिल्ह्यांपैकी जालना व बीडमध्ये सरासरी क्षेत्राहून अधिक खरिपाची पेरणी झाली. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मात्र सरासरी क्षेत्राइतकी पेरणी झाली नसल्याची स्थिती. कृषी विभागाचा पेरणी अहवाल आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतो आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तिन्ही जिल्ह्यांत २० लाख ९० हजार १९८ हेक्टर क्षेत्र खरिपासाठी प्रस्तावित करण्यात आले होते त्या तुलनेत तीनही जिल्ह्यांत २१ लाख ७ हजार ४७५ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १००.८३ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ९८.५७ टक्के, जालना जिल्ह्यात १०१.१७ टक्के तर बीड जिल्ह्यात १०२.५२ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली.

Kharif Sowing
Kharif Sowing : नगरला खरीप पेरा सरासरीच्या सव्वाशे टक्के

सोयाबीनला अधिक पसंती

पेरणी करताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला सर्वाधिक पसंती दिली. त्या पाठोपाठ कपाशी लागवड झाली असून उडदाची सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी केली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत कपाशीची ९ लाख १७ हजार २८७ हेक्टरवर तर सोयाबीनची ६ लाख ३७ हजार ८६२ हेक्टरवर पेरणी झाली.

तुरीची १ लाख ३८ हजार हेक्टरवर, मुगाची ३९ हजार १७७ हेक्टरवर, उडदाची ६२ हजार ११७ हेक्टरवर, मक्याची २ लाख ४४ हजार ९५५ हेक्टर बाजरीची ५२,१३५ हेक्टरवर, खरीप ज्वारीची १२३१ हेक्टरवर, इतर तृणधान्यांची २७९१ हेक्टरवर इतर कडधान्याची १५१८ हेक्टरवर, भुईमुगाची ८५३४ हेक्टर, सूर्यफुलाची ११४ हेक्टरवर, तिळाची ५१७ हेक्टरवर, कारळ्याची ६२ हेक्टरवर तर इतर गळीत धान्यांची ११३० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : ज्वारी, उडीद, मुगाच्या पेरणीत लक्षणीय घट

अशी आहे पीक स्थिती

मका पिकावर काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. याशिवाय फुलंब्री तालुक्यात अनेक ठिकाणी गोगलगायींचाही प्रादुर्भाव आढळून आला आहे. मुगाचे पीक शेंगा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी पिकाची काढणी सुरू आहे. उडदाचे पीक काही ठिकाणी दाणे भरण्याच्या तर काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे.

ज्वारीचे पीक वाढीच्या अवस्थेत असून कपाशीवर काही ठिकाणी रस शोषण करणाऱ्या कीडींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सोयाबीनवरही काही ठिकाणी उंटाळी पाने गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तुरीवरही काही ठिकाणी पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

जिल्हानिहाय सरासरी व प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी प्रत्यक्ष पेरणी

छ.संभाजीनगर ६८४७१६ ६७४९४५

जालना ६१९६९५ ६२६९६०

बीड ७८५७८६ ८०५५७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com