Pune Sowing Report: गेल्या काही दिवसांतील दमदार पावसानंतर पुणे विभागात पावसाने उघडीप दिल्याने खरीप पेरण्यांना वेग आला आहे. पुणे विभागातील सरासरी १२ लाख ५६ हजार ४३९ हेक्टर खरीप क्षेत्रापैकी ४ लाख १६ हजार ५९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून, हे एकूण क्षेत्राच्या ३३ टक्के आहे. हवामान अनुकूल राहिल्यास पुढील पंधरवड्यात बहुतांश पेरण्या पूर्ण होतील, अशी माहिती कृषी विभागाने दिली..अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाची उघडीप मिळाल्याने पेरण्यांना गती आली आहे. अकोले तालुक्यात भाताची पुनर्लागवड सुरू असून, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन आणि कापूस ही पिके उगवणीच्या अवस्थेत आहेत. अकोले तालुक्यात १,२१०.५९ हेक्टर क्षेत्रावर भात रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत..Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?.पुणे जिल्ह्यातही खरीप पेरण्या वेगाने सुरू असून, भाताची पुनर्लागवड सुरू झाली आहे. बाजरी, मका, मूग, भुईमूग आणि नाचणीची पेरणी झालेली असून, ही पिके उगवणीच्या अवस्थेत आहेत. सोयाबीनची पेरणीही सुरू झाली आहे..Kharif Sowing: बुलडाणा जिल्ह्यात खरीप पेरणीला वेग.सोलापूर जिल्ह्यात बाजरीचे पीक उगवणीच्या अवस्थेत असून त्याची स्थिती चांगली आहे. मका उगवण ते रोप अवस्थेत, तर मूग व उडीद रोप अवस्थेत आहेत. तूर उगवणीच्या अवस्थेत असून, सोयाबीन उगवण ते रोप अवस्थेत आहे. बहुतांश पिकांची स्थिती समाधानकारक असल्याचे कृषी विभागाने नमूद केले..पीक पेरणी विभागातील जिल्हानिहाय पीक पेरणीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)जिल्हा सरासरी पेरलेले क्षेत्र टक्केअहिल्यानगर ७१६२०१ ३११५२५ ४३पुणे २०२२६३ ३२१२१ १६सोलापूर ३३७९६७ ७२९५० २२एकूण १२५६४३९ ४१६५९६ ३३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.