Nanded News: हदगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री संघात केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदीस सुरवात झाली असून, आतापर्यंत २ हजार ५४४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. सध्या जवळपास २ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात बारदाना उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन या केंद्रावर आणावे, असे आवाहन चेअरमन बालासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन विनायकराव कदम, संचालक प्रभाकरराव पत्तेवार यांनी केले आहे..खरेदी केंद्राचा प्रारंभ सहायक निबंधक गणलेवार यांच्या हस्ते व संस्थेच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत काटा पूजन करून करण्यात आला. पहिल्या दिवशी तळेगाव येथील शेतकरी भगवान दिगंबर शिंदे यांचे सोयाबीन खरेदी करण्यात आले. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ आणि टोपी घालून सत्कार करण्यात आला. .Soybean Procurement: सोयाबीनची खरेदी अर्ध्यापेक्षा कमीच .या वेळी संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब शिंदे, उपाध्यक्ष विनायकराव कदम, संचालक प्रभाकरराव पत्तेवार, बळिरामजी देवकते, सुभाष राठोड, धनंजय शिंदे, परमेश्वर गोपतवाड, शेषराव पाटील सूर्यवंशी, यशवंत कडबे, सुदर्शन भारती, संजय कवडे, गणेशराव तावडे, डॉ. सुरेश जाधव, सुभाषराव पवार, रत्नाकर जांबुतकर, संस्थेचे सचिव बालाजी हराळे तसेच कर्मचारी उपस्थित होते..Soybean Procurement: सोयाबीनची खरेदी उद्दिष्टाच्या आठ टक्केच.सध्या बाजारात सोयाबीनचा भाव ४,२०० ते ४,७०० रुपये प्रतिक्विंटल असून, हदगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या खरेदी केंद्रावर ५,३२८ रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांनी आधार लिंक असलेलेच बँक खाते खरेदी केंद्रावर द्यावे. .खरेदी केलेल्या मालाचे पैसे १५ ते २० दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या संबंधित बँक खात्यावर जमा करण्यात येतील, असे सांगण्यात आले. खरेदीदरम्यान शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे तपासली जाणार आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.