Nanded News: मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजारभावातील अनिश्चितेपासून दिलासा देण्यासाठी शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत बारड येथे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय शितलादेवी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीने घेतला आहे. या केंद्राकडून नुकतीच खरेदी सुरू करण्यात आली. बारडला केंद्र सुरू करण्यासाठी खासदार अशोक चव्हाण, आमदार श्रीजया चव्हाण यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. .नाफेड तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बारडमध्ये शितलादेवी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीचे सोयाबीन शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात प्रगतशील शेतकरी लिंगोजी सूर्यवंशी यांच्या सोयाबीनची शासन हमीभावाने खरेदी करण्यात आली. .Soybean Procurement: नांदेड जिल्ह्यात ‘कृषी पणन’च्या केंद्रावर सोयाबीन खरेदी खडलेलीच.शासनाने निश्चित केलेलां प्रति क्विंटल ५३२८ रुपये भाव शेतकऱ्यांना मिळणार आहे. या केंद्राचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नीलेश देशमुख बारडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी तालुका उपविभागीय निबंधक जनार्दन हटकर, माजी सरपंच दिलीप कोरे, शितलादेवी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीचे संचालक विनायक देशमुख, माधव बिरादार, शंभुनाथ बिरादार, गजानन देशमुख, आकाश पार्डीकर, नामदेव उपवार यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते..Soybean Procurement: सातारा जिल्ह्यात हमीभावाने ८३ लाखांची सोयाबीन खरेदी.सध्या भुसार बाजारात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ४४०० ते ४५०० रुपये एवढा भाव मिळतो. याबरोबरच आलोवा, माती मिश्रित, दाडी असल्याचे कारण सांगून कट्टीच्या नावाखाली मोठी कपात केली जाते. परंतु शासनाचे खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना भुसार बाजारात सोयाबीन विक्री करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. .यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात होती. शितलादेवी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीने खरेदी केंद्र सुरू केल्याने शासनाचा हमीभाव दर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. शेतकऱ्यांनी योग्य भावासाठी सोयाबीन थेट शासकीय हमीभाव केंद्रावर आणावे असे आवाहन शितलादेवी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीचे मुख्य प्रवर्तक नीलेश देशमुख यांनी केले आहे. २०२५-२६ साठी हमीभाव योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाने निश्चित केलेल्या एफएक्यू दर्जा नुसारच सोयाबीन खरेदी केले जाणार आहे. यामुळे बारड भागातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यां ना दिलासा मिळाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.