Soybean Crop Insurance : सोयाबीन उत्पादक शेतकरी अग्रिम पीकविम्याच्या प्रतीक्षेत

Advance Crop Insurance : परभणी जिल्ह्यातील स्थिती; ५२ मंडलांतील ४ लाख ४१ हजारांवर विमा अर्ज
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती (मिड सीझन अॅडव्हर्सिटी) या जोखीमबाबीअंतर्गत सोयाबीनसाठी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर संभाव्य विमा भरपाईतून २५ टक्के अग्रिम रक्कम जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी देऊन महिनाभराचा कालावधी उलटला आहे.

परंतु विमा कंपनीने अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिम पीकविमा परतावा जमा केलेला नाही. अल्प पावसामुळे यंदा आर्थिक अडचणीत असलेले परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलांतील ४ लाख ४१ हजार १७३ सोयाबीन उत्पादक शेतकरी अग्रिम विमा रकमेच्या प्रतिक्षेत आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविम्यासाठी १ लाख २६ हजारांवर पूर्वसूचना

या वर्षी (२०२३) पावसाळ्यात जुलै व ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या दीर्घ खंडामुळे (सलग २१ ते २२ दिवस) सोयाबीनच्या यंदाच्या उत्पादनात मागील ७ वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ६४ ते ६७ टक्के घट अपेक्षित असलेल्या ११ मंडलांसाठी शुक्रवारी (ता. २५ ऑगस्ट) व ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असलेल्या ४१ मंडलांसाठी शुक्रवारी (ता. ८ सप्टेंबर) असे मिळून जिल्ह्यातील एकूण ५२ मंडलांतील सोयाबीनसाठी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर संभाव्य विमा भरपाईतून २५ टक्के अग्रिम रक्कम जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा पीकविमा योजना जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी अधिसूचना काढलेली आहे.

Crop Insurance
Crop Insurance : सातारा जिल्हातील ६३ मंडले अग्रिमसाठी पात्र

जिल्ह्यात पीकविमा योजना राबवीत असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि. विमा कंपनीनीने अधिसूचना जाहीर झाल्यापासून १ महिन्याच्या आत सोयाबीनसाठी विमा संरक्षण घेतलेल्या सर्व पीकविमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के अग्रिम रक्कम जमा करावी, असे आदेश आहेत. परंतु विमा कंपनीने अद्याप या आदेशाची अमंलबजावणी केलेली नाही. अग्रिम विमारक्कम तत्काळ जमा करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

मंडलनिहाय सोयाबीन उत्पादकता (प्रतिहेक्टरी क्विंटलमध्ये), पीकविमा अर्ज स्थिती

मंडल...सरासरी उत्पादकता...अपेक्षित उत्पादन...पीकविमा अर्ज

परभणी शहर...१३.१०...५.९०...१०२८

परभणी ग्रामीण...१३.१०...६.०३...९३५५

पेडगाव...१०.८२...४.७६...७१७६

जांब...११.३८...५.००...१२०१०

सिंगणापूर....११.५६...४.०४...८८११

दैठणा...११.०६...३.७६...१३७१५

झरी...११.८१...५.२०...११०६८

पिंगळी...११.०१...४.९५...१०६७२

टाकळी कुंभकर्ण...११.२७...४.९६...६९७९

जिंतूर...९.७०...३.२०...८३७१

बोरी...१०.१८...४.६८...८११०

सावंगी म्हाळसा...९.३६...४.२१...७९५४

बामणी...९.४१...४.१४...९१८२

आडगाव...१०.४४...४.५९...७५९८

चारठाणा...९.७२...४.३७...७१७९

वाघी धानोरा...९.७९...४.२२...८४१३

दूधगाव...९.७९...४.३१...१०१३१

सेलू....११.७९...३.८९...५९८९

देऊळगाव गात...१०.४७...४.६०...६७८०

Crop Insurance
Crop Insurance : अग्रीम भरपाईचं घोडं अडलं कुठं? विमा कंपन्यांची भुमिका काय?

वालूर...१०.२८...४.६२...५८७५

कुपटा...१०.२९...४.५२...७११६

चिकलठाणा...९.६३...४.३३...६७०२

मोरेगाव...१०.२४...४.७१...४७११

मानवत...१०.६३...४.६८...५१६९

कोल्हा...११.२३...४.९४...६७०४

केकरजवळा...११.९७...४.०६...५१६९

रामपुरी...१०.३३...४.५४...६१०३

ताडबोरगाव...११.५७...५.०९...५७२८

पाथरी...१२.५१...४.२५...८०८२

बाभळगाव...११.८१....४.०१...८७८३

हादगाव...१२.७५...५.६१...६७१९

कासापुरी...१२.०९...५.३२...७७२५

सोनपेठ...८.३६...३.७६...८०२५

आवलगाव...८.३०...३.७३...८५०४

शेळगाव...७.९९...३.५९...५३१६

वडगाव...८.२४...३.७१...९७५७

गंगाखेड...९.३६...४.३०...१०२५४

महातपुरी...६.३१...२.९०...१११०३

माखणी...८.६१...३.७९...१५१२६

राणीसावरगाव...८.७८...३.८६...११०७५

पिंपळदरी...७.१३...३.१३...१२४१५

पालम...१०.७०...४.७०...९८३२

चाटोरी...१२.३२...५.५४...८९६२

बनवस...८.३६...३.८४...६३४३

रावराजूर...११.९५...४.०६...८९९८

पेठशिवणी...९.९३...३.५७...१०५५९

पूर्णा...१४.६३...६.५८...८७५८

ताडकळस...११.१३...४.००...९०५३

लिमला...१०.३२...३.७१...१०२०४

कात्नेश्‍वर...१२.१४...५.४६...९३२९

चुडावा...१०.०९...४.५४...९८७२

कावलगाव...११.३७...५.११...९७४६

राज्य सरकारच्या हिश्शाचा विमा हप्ता विमा कंपनीस भरल्याबाबत अजून स्पष्टता दिसत नाही. शेतकऱ्यांना अग्रिम विमा रक्कम मिळण्यासाठी सरकारने तत्काळ विमा हप्ता जमा करणे आवश्यक आहे.
हेमचंद्र शिंदे, पीकविमा अभ्यासकशेतकरी, रावराजूर, ता. पालम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com