Crop Insurance : पीकविम्यासाठी १ लाख २६ हजारांवर पूर्वसूचना

Crop Damage Intimation : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) सप्टेंबर महिन्यात अनेक मंडलांत अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.
Crop Insurance
Crop Insurance Agrowon
Published on
Updated on

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) सप्टेंबर महिन्यात अनेक मंडलांत अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती (लोकल कॅलॅमिटी) या जोखीम बाबीअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख २६ हजार ७३३ पूर्वसूचना विमा कंपनीकडे दाखल केल्या आहेत अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यात यंदा (२०२३- खरिपात) अखेर ३ लाख ५९ हजार ८७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनची २ लाख ७७ हजार ८४४ हेक्टरवर पेरणी, कपाशीची ३१ हजार ३४७ हेक्टर लागवड झाली. तुरीची ३२ हजार २६६ हेक्टर, मुगाची ५ हजार ७०१ हेक्टर, उडदाची ४ हजार ५१० हेक्टर, ज्वारीची ३ हजार २६७ हेक्टरवर पेरणी आहे.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा नुकसान भरपाई न दिल्यास कंपन्यांवर कारवाई

यंदा पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत ५ लाख ५ हजार ५९६ शेतकऱ्यांनी ३ लाख २० हजार १६६ हेक्टरवरील पिकांसाठी १ हजार ६९० कोटी ५० लाख ४१ हजार २४९ रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे.

त्यात सोयाबीन २ लाख ६२ हजार १३ हेक्टर, कपाशी २७ हजार ५१६ हेक्टर, तूर १९ हजार २१० हेक्टर, मूग ४ हजार ९९२ हेक्टर, उडीद ३ हजार ७५२ हेक्टर, ज्वारी २ हजार ६६६ हेक्टर या पिकांचा समावेश आहे.

हिंगोली तालुक्यात ६२ हजार ९८६ हेक्टर, कळमनुरीत ६३ हजार ५७३ हेक्टर, वसमत तालुक्यात ६५ हजार ४३२ हेक्टर, औंढा नागनाथ तालुक्यात ५२ हजार ६४० हेक्टर, सेनगाव तालुक्यात ७५ हजार ५५३ हेक्टर एवढे पीकविमा संरक्षित क्षेत्र आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यात अनेक मंडलात अतिवृष्टी झाली.

Crop Insurance
Crop Insurance : अग्रिम आख्यान

नद्या, नाल्यांच्या पुराच्या पाण्यामुळे शेतातील उभे सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबद्दल विमा परतावा मंजूर करावा यासाठी एचडीएफसी अर्गो जनरल इन्शूरन्स कंपनीकडे १ लाख २६ हजार ७३३ पूर्वसूचना (तक्रारी) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दाखल केल्या आहेत. त्याअनुषंगाने पीकविमा भरपाई मंजुरीसाठी नुकसानीचे सर्वेक्षण केले जात आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत पूर्वसूचना स्थिती

तालुका पूर्वसूचना (इंटिमेशन्स)

हिंगोली २९७४१

कळमनुरी २१८०८

वसमत २४४१०

औंढा नागनाथ २२८९३

सेनगाव २७८८१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com