Soybean Cultivation : सोयाबीनच्या स्थिर लागवडीचा अंदाज

Soybean Sowing Akola : गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन हे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक बनलेले आहे. यंदाही शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे असल्याचे स्पष्ट दिसते आहे.
Soybean Sowing
Soybean SowingAgrowon
Published on
Updated on

Akola News : आगामी खरीप हंगामात अकोला जिल्ह्यातील शेतकरी पीक निवडीत काहीसा बदल करीत असल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात यंदाही सोयाबीनची लागवड गेल्या वर्षीच्या प्रमाणातच म्हणजे सुमारे दोन लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दुसरीकडे कपाशीच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन हे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक बनलेले आहे. यंदाही शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे असल्याचे स्पष्ट दिसते आहे. पावसावर अवलंबून असलेला अकोला जिल्हा असल्यामुळे पाण्याची कमी असलेल्या भागात सोयाबीन योग्य पर्याय ठरतो.

Soybean Sowing
Soybean Sowing : साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणीचा अंदाज

दरम्यान, बाजारात कापसाला मिळणारा दर आणि शाश्वत उत्पादनामुळे अनेक शेतकरी कपाशीच्या लागवडीकडे वळताना दिसत आहेत. यंदा कपाशीचे क्षेत्र १ लाख २२ हजार हेक्टरवरून एक लाख पाच हजार हेक्टरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. म्हणजेच सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्र वाढीची शक्यता आहे.

सोयाबीनची दोन लाख ४१ हजार हेक्टरवर लागवड होणार असून या हंगामात उत्पादकता १७०० किलोपर्यंत नेण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. तर कपाशीची उत्पादकताही २०२४-२५ मध्ये ४२५ किलो रूईवरून ४७० किलो करण्याचा प्रयत्न आहे.

Soybean Sowing
Summer Soybean Sowing : उन्हाळ सोयाबीन खानदेशात कमी

खरिपातील इतर पिकांचा विचार करता तूर क्षेत्र वाढून ६५ हजार हेक्टरपर्यंत पोहोचेल. तर मूग ३४८० हेक्टर, उडीद तीन हजार, खरीप ज्वारी दोन हजार हेक्टरवर पेरणीची शक्यता आहे. गेल्या हंगामात लागवड झालेल्या चार लाख २९ हजार ८२३ हेक्टरच्या तुलनेत लागवड क्षेत्र चार लाख ४२ हजार ८०० हेक्टरपर्यंत जाऊ शकते.

बियाण्यांची गरज

सोयाबीनच्या दोन लाख ४१ हजार हेक्टरसाठी ६३४३१ क्विंटल बियाणे लागेल. कपाशी बियाण्यांची सहा लाख ३६५ पाकिटे लागतील. तुरीचे ३४१२ क्विंटल, मूग ९१, उडीद १२६, ज्वारी १५०, मका ३० असे सर्व मिळून ७३ हजार ६०७ क्विंटल बियाणे लागणार आहे.

शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहून योग्य पीक निवड करणे गरजेचे आहे. पुरेशी ओल तयार झाल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीपूर्वी प्रत्येक बियाण्यांची बीजप्रक्रिया करावी. अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्याची खरेदी करून त्याची रीतसर पावती घ्यावी व बियाण्यांचे लेबल व पावत्या नीट सांभाळून ठेवाव्यात. खत किंवा बियाण्यांबाबत काहीही तक्रार असल्यास तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा.
- शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com