Soybean Cultivation : खानदेशात सोयाबीनचे क्षेत्र वाढले

Soybean Sowing : खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा काहीशी वाढली आहे. पेरणी सुमारे ४० हजार हेक्टरवर झाली आहे.
Soybean Sowing
Soybean SowingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा काहीशी वाढली आहे. पेरणी सुमारे ४० हजार हेक्टरवर झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यातील पेरणी सुमारे २२ हजार हेक्टरपर्यंत असल्याची माहिती आहे.

धुळे व नंदुरबारात सोयाबीनची पेरणी कमी असते. या भागात शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी मका, कापूस आदी पिकांना पसंती दिली आहे. सोयाबीनचे उत्पादन वाढेल, कारण पेरणी वाढली असून, पीकस्थिती बरी आहे. मात्र नंदुरबार, धुळ्यातील पेरणी फारशी वाढलेली नाही.

जळगाव जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी मागील महिन्यातच बऱ्यापैकी झाली आहे. त्यात कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी तुषार सिंचन, ठिबकच्या माध्यमातून सोयाबीनचे सिंचन करण्याची व्यवस्था केली आहे.

सोयाबीनचे दर मागील अस्थिर होते. किमान ३५० व कमाल ४४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर अनेकांना हंगामात मिळाला. नंतरही दर असेच होते. आता पेरणीच्या वेळेसही दर ३८०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते.

परंतु अन्य पिकांचा पर्याय चांगला नसल्याने सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली. पुढेही चार हजार रुपयांवर दर टिकून राहतील व अधिकचा नफा मिळेल, या नियोजनातून शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे. सोयाबीनची पेरणी धुळे, नंदुरबारात वाढण्याची शक्यता फारशी नव्हती.

Soybean Sowing
Soybean Sowing Method : सुधारित जोडओळ पद्धतीने करा सोयाबीन पेरणी

या दोन्ही जिल्ह्यांत सुमारे १८ हजार हेक्टरवर सोयाबीन पीक आहे. जळगाव जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी १८ हजार हेक्टरवर अपेक्षित होती. परंतु पेरणी काहीशी वाढली आहे. पेरणीनंतर पाऊस आल्याने पेरणी यशस्वी झाली आहे. दुबार पेरणीची वेळ अपवाद वगळता आलेली नसल्याचे सांगण्यात आले.

Soybean Sowing
Soybean Sowing : नांदेड जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणी

पेरणी काळ्या कसदार जमिनीत अधिक

सोयाबीनची पेरणी गिरणा, तापी, वाघूर नदीच्या क्षेत्रात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सोयाबीन रावेर भागात कमी आहे. परंतु यावल, चोपडा, पाचोरा, जामनेर, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, जळगाव, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात सोयाबीन आहे. सोयाबीन पीक अनेकांचे १५ ते १८ दिवसांचे झाले आहे. काहींचे पीक अर्धा फूट उंचीचे झाले आहे.

पेरणी जूनच्या मध्यातच अनेकांनी केली होती. यामुळे काही शेतकऱ्यांचे पीक बऱ्यापैकी दिसत आहे. त्यात एक वेळेस रासायनिक खतही अनेकांनी दिले आहे. काळ्या कसदार जमिनीतील पीक चांगले असून, वाढ होत आहे.

अनेक शेतकऱ्यांनी लहान फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली आहे. काही शेतकऱ्यांनी खरिपात उत्पादन घेतल्यानंतर आपल्याकडील बियाण्याची उगवणक्षमता तपासून त्यावर बीजप्रक्रिया करून पेरणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com