Market Bulletin:सोयाबीन टिकूनदेशातील बाजारात सोयाबीनच्या भावात आज काहीशी सुधारणा दिसून आली. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचा भाव क्विंटलमागे ५० रुपयांनी वाढवला होता. तर बाजार समित्यांमध्येही काहीशी सुधारणा झाली होती. प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव सरासरी ६ हजार ३०० ते ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. तर बाजार समित्यांमध्ये सरासरी ५ हजार ७०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सोयाबीनच्या भावातील सुधारणा पुढील काही दिवस कायम राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापसाला उठावदेशातील बाजारात गुणवत्तापूर्ण कापसाला चांगला उठाव आहे. कापसाच्या भावात झालेली वाढ टिकून आहे. सीसीआयकडे कापसाचा चांगला साठा आहे. यामुळे सीसीआयने कापूस विक्रीचा भाव वाढवला आहे. सीसीआयने कापूस विक्रीचा भाव खंडीमागे मागील दोन महिन्यांमध्ये ९ हजार रुपयाने वाढवला आहे. तर बाजारात कापसाला गुणवत्तेप्रमाणे ८ हजार २०० ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कापसाची बाजातील आवक कमीच झालेली आहे. देशातील उत्पादन कमी असल्याचा बाजारावर परिणाम दिसून येत आहे. कापसाच्या भावातील सुधारणा काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच.हळदीचे भाव टिकूनदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून बाजारातील हळदीची आवक वाढली आहे. हळदीची काढणी महत्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये वाढली आहे. त्यामुळे हळदीची विक्रीही वाढली आहे. राज्यातील बाजारांमध्येही हळदीची आवक वाढलेली आहे. याचा दरावर दबाव असून हळदीचा भाव स्थिर दिसत आहे. सध्या बाजारात हळद प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकली जात आहे. पुढील काही दिवस बाजारात आवकेचा दबाव राहण्याची शक्यता आहे. तोपर्यंत दरपातळी काहीशी स्थिरावू शकते, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: सोयाबीन दरात वाढ; कापूस टिकून, मका आवक स्थिरावली, आवळ्याला मागणी तर ज्वारी आवक सुधारली.कांदा दबावातचदेशातील बाजारात कांद्याचा भाव दबावातच आहे. बाजारातली सध्या कांद्याची आवक चांगली सुरु आहे. निर्यात अद्यापही सरासरीपेक्षा कमीच होत आहे. आखाती देशांना निर्यात ठप्प झाली आहे. वाढत्या उन्हामुळे काही भागात कांदा पिकाला उष्णतेचा फटका बसत आहे. त्यात ढगाळ हवामानाचाही पिकावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना या सर्व कारणांमुळे बाजारात कांदा विकावा लागत आहे. बाजारातील आवक जास्त असल्याने दरावर दबाव आला आहे. सध्या कांदा ५०० ते ९०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. आवकेचा दबाव पुढील काही आठवडे राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे भावावरही दबाव राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ज्वारी आवक सुधारलीराज्यातील अनेक बाजारात ज्वारीची आवक सुधारली आहे. तर ज्वारीला मिळणारा उठाव स्थिर आहे. त्यामुळे ज्वारीचे भावही काही बाजारांमध्ये स्थिरावले आहेत. यंदा रब्बी हंगामात ज्वारीचे पीक चांगले आल्याचे शेतकरी सांगत आहेत. याचा दबाव बाजारावर आहे. सध्या बाजारात ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. ज्वारीची बाजारातील आवक काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्वारीचा भावही स्थिरावू शकतो, असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.